घरदेश-विदेशCorona: उत्तर प्रदेशात महागली दारू; पेट्रोल आणि डिझेलच्या दरातही वाढ

Corona: उत्तर प्रदेशात महागली दारू; पेट्रोल आणि डिझेलच्या दरातही वाढ

Subscribe

ढासळलेली अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी योगी सरकारने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे उत्तर प्रदेश सरकारच्या कमाईला मोठा धक्का बसला आहे. अशा परिस्थितीत ढासळलेली अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी योगी सरकारने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहे. दरम्यान, उत्तर प्रदेश सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ केली असून दारूचे दरही वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. योगी सरकारच्या मंत्रिमंडळाने बुधवारी हे दोन्ही प्रस्ताव मंजूर केले आणि नव्या किंमती देखील तत्काळ लागू करण्यात आल्या आहेत. कोरोनामुळे सरकारच्या महसुलात घट निर्माण झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे.

असे आहे पेट्रोल आणि डिझेल नवे दर

कोरोनामुळे पेट्रोलचे दर दोन रुपयांनी तर डिझेलच्या दरात एक रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. आता राज्यातील पेट्रोलची किंमत प्रति लिटर ७३.९१ रुपये करण्यात आली आहे, जी याआधी ७१.९१ रुपये होती. तर डिझेलची किंमत प्रति लिटर ६३.८६ रुपये करण्यात आली असूनजी आधी ६२.८६ रुपये होती.

- Advertisement -

दारू देखील महागली 

त्याचबरोबर देशी दारू ५ रुपये, विदेशी दारूच्या १८० मिली वर १० रुपये तर १८० मिलीपासून ५०० मिलीपर्यंत २० रुपये तसेच ५०० मिली पेक्षा वर असलेल्या दारूची किंमत ३० रुपयांनी वाढवण्यात आली आहे. यूपीमध्ये सोमवारपासूनच दारूची दुकानं उघडण्यात आली असून पहिल्याच दिवशी सुमारे १०० कोटींची दारू विकली गेली आहे.


नाशिक : मद्यधुंद पोलिसांचा राडा; पोलिसांवर गुन्हा दाखल

फक्त लखनऊमध्ये सोमवारी साडेसहा कोटी दारूची विक्री झाली. मात्र, लॉकडाऊनमुळे मंगळवारी दारूच्या दुकानात तळीरामांची गर्दी कमी होती. तर मंगळवारी सोमवारीच्या तुलनेत साडेतीन कोटींची मद्यविक्री झाली. मंगळवारी गाझियाबादमधील दारूची दुकानं उघडली होती मात्र आज सकाळी जवळपास सर्व दुकानं दारूचा पुरेसा साठा नसल्यामुळे बंद करण्यात आली होती.

- Advertisement -

यापूर्वी केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील कर वाढविला होता. पेट्रोलवर प्रतिलिटर उत्पादन शुल्कात १० रुपये आणि डिझेलवर १३ रुपयांची वाढ करण्यात आली होती. यासह, पेट्रोल आणि डिझेलवरील कर वाढवून ६९ टक्के करण्यात आला होता जो जगातील सर्वाधिक आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -