घरताज्या घडामोडीCoronavirus: कोरोनाबाधित आहात, पण लक्षणे नाहीत? मग काय करायचे, काय नाही? सरकारने...

Coronavirus: कोरोनाबाधित आहात, पण लक्षणे नाहीत? मग काय करायचे, काय नाही? सरकारने सांगितले

Subscribe

देशात पुन्हा एकदा कोरोनाची रुग्णसंख्या खूप वेगाने वाढत आहे. आज देशात ९० हजारांहून अधिक नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. पण दिलासादायक बाब म्हणजे दररोज आढळत असलेल्या कोरोनाबाधितांमध्ये अनेक जण लक्षणेविरहित आणि सौम्य लक्षणे असलेले रुग्ण आहेत. त्यामुळे केंद्राने लक्षणेविरहित आणि सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी होम आयसोलेशनचा कालावधी कमी केला आहे. पहिल्या आणि दुसऱ्या कोरोनाच्या लाटेमध्ये होम आयसोलेशनचा कालावधी १४ दिवसांचा होता, मात्र आता हा फक्त ७ दिवसांचा ठेवला आहे. जर ७ दिवसांपर्यंत आयसोलेशनमध्ये राहिल्यानंतर ताप नसेल तर त्या रुग्णांना पुन्हा कोरोना चाचणी करण्याची गरज नाही, असे केंद्राने स्पष्ट केले आहे.

लक्षणेविरहित रुग्ण कोण आहेत?

नव्या गाईडलाईन्सनुसार, ज्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, पण त्यांच्यामध्ये ताप आणि खोकल्यासारखी लक्षणे दिसत नाहीत. तसेच त्यांचे ऑक्सिजन लेव्हल ९३पेक्षा कमी नाही, अशा रुग्णांना लक्षणेविरहित रुग्ण म्हटले जात आहे.

- Advertisement -

तसेच ज्या रुग्णांमध्ये सर्दी, घशात खवखव आणि तापासारखी लक्षणे आहेत, परंतु ऑक्सिजन लेव्हल ९३ पेक्षा कमी असेल अशा रुग्णांना सौम्य लक्षणे असलेले रुग्ण म्हटले जात आहे. दरम्यान जर तुम्ही होम आयसोलेशनमध्ये ७ दिवस असाल पण अखेरच्या ३ दिवसात तुम्हाला ताप नसला पाहिजे, नाही तर तुमचा आयसोलेशनचा कालावधीत वाढ होईल.

होम आयसोलेशनमध्ये काय करावे, काय करू नये?

सध्या कोरोना पॉझिटिव्ह आलेले रुग्ण रुग्णालयात भरती होण्याचे प्रमाण कमी आहे. अशातच घरी लोकं आयसोलेट होत आहेत. पण आरोग्य तज्ज्ञांच्या मते होम आयसोलेशनमध्ये Do’s And Don’ts लक्षात घेणे खूप महत्त्वाचे आहे. इंडियन मेडिकल असोसिशयनचे माजी अध्यक्ष आणि यूपी मेडिकल काउंसिल सदस्य डॉ. पी के गुप्ता म्हणाले की, सध्या लक्षणांमध्ये घशात खवखव, सौम्य सर्दी, सौम्य ताप जास्त करून पाहायला मिळत आहेत. ही लक्षणे गेल्या लक्षणांपेक्षा थोडी वेगळी आहेत. गेल्या लक्षणांमध्ये लोकांना जास्त करून खोकला होत होता. तसेच तीव्र ताप येत होता.

- Advertisement -

होम आयसोलेशन दरम्यान व्हेंटिलेशन गरजेचे

पुढे डॉ. पीके गुप्ता म्हणाले की, जर तुम्ही होम आयसोलेट आहात, तर तुम्ही तुमची खोली एकदम बंद करू नका. वेगळे राहा, पण खोलीत खेळती हवा पाहिजे. म्हणजे खोलीत व्हेंटिलेशन असले पाहिजे. सकाळ-संध्याकाळ खिडकी उघडी ठेवा. जर थंडी वाजली तर ब्लोअरचा वापर करा. होम आयसोलेशनची सविस्तर गाईडलाईन जारी केली आहे. त्याचे तंतोतंत पालन करा.

लखनऊचे सीएमओ डॉ. मनोज अग्रवाल म्हणाले की, अशा रुग्णांना जरी लक्षणे असो किंवा नसो. घरातील इतर सदस्यांपासून एकदम दूर राहिले पाहिजे. विशेष म्हणजे वृद्ध आणि आजारग्रस्त असलेल्या व्यक्तींपासून दूर राहिले पाहिजे.

मास्क लावा

काही लोकांना खोलीत एकटे असल्यावर मास्क लावायची गरज नसल्याचे वाटते. परंतु अशा रुग्णांनी नेहमी ट्रिपल लेअर मास्क लावला पाहिजे आणि प्रत्येक ८ तासाला मास्क बदलला पाहिजे. तसेच जर यापूर्वी मास्क थोडा जरी ओलसर झाला असेल तर दुसरा मास्क वापरा. पुरेसे हायड्रेशन आवश्यक असल्याने रुग्णांनी द्रवपदार्थ घ्यावे. होम आयसोलेशनमध्ये साफ-सफाई खूप महत्त्वाची आहे.


हेही वाचा – Corona: चीनमध्ये ड्रॅगन फ्रूटमध्ये आढळला कोरोना, सुपरमार्केट केले सील


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -