घरताज्या घडामोडीCorona Vaccine: तंबाखूपासून तयार केली कोरोना लस? मानवी चाचण्यांसाठी अर्ज...

Corona Vaccine: तंबाखूपासून तयार केली कोरोना लस? मानवी चाचण्यांसाठी अर्ज…

Subscribe

एकाबाजूला जागतिक आरोग्य संघटनेच्या संशोधकांनी तंबाखू सेवन करणाऱ्या लोकांना कोरोनाचा अधिक धोका असल्याचे सांगितले आहे. पण दुसरीकडे तंबाखूपासून कोरोना वॅक्सीन तयार करत असल्याचे समोर येत आहे. एप्रिलमध्ये ब्रिटिश अमेरिकन टोबॅको नावाच्या कंपनीचे सब्सडियरी कंपनी केंटकी बायोप्रोसोसिंगने सांगितले की, ‘प्रायोगिक तत्वावर कोविड-१९ वॅक्सीन तयार केली जात आहे. ही वॅक्सीन तंबाखूपासून तयार केली जात आहे.’ आता याच कंपनीने सांगितले की, ‘लवकरच या लसीची मानवी चाचणी केली जाणार आहे.’

लंडनमध्ये स्थित असलेल्या लकी स्ट्राइक सिगारेट तयार करणाऱ्या कंपनीने असा दावा केला आहे की, ‘त्यांनी तंबाखूच्या पानातून काढलेल्या प्रोटीनपासून वॅक्सीन तयार केली आहे.’ या कंपनीचे चीफ मार्केटिंग ऑफिसर किंग्सले व्हिटन म्हणाले की, ‘कंपनीने अमेरिकाच्या फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रशनकडे मानवी चाचणी करण्याबाबत अर्ज दिला आहे.’

- Advertisement -

व्हिटन पुढे म्हणाले की, ‘या वॅक्सीनच्या मानवी चाचणीसाठी परवानगी मिळले अशी आम्हाला खात्री आहे. आम्ही लोकांचा कोरोना व्हायरसच्या महामारीपासून बचाव करू शकतो. आमच्या वॅक्सीनने प्री-क्लिनिकल चाचणीमध्ये कोविड-१९ विरोध चांगला रिस्पॉन्स दिला आहे.’ ‘ज्या पद्धतीने वॅक्सीन तयार करत आहोत इतरपेक्षा वेगळी आहे. आम्ही तंबाखूच्या झाडातून प्रोटीन काढून त्यापासून कोविड-१९ वॅक्सीन तयार करत आहोत’, असा या कंपनीने दावा केला आहे.

- Advertisement -

कंपनीच्या म्हणण्यानुसार, ‘पारंपारिक पद्धतीपेक्षा वॅक्सीन तयार करण्यासाठी या पद्धतीस कमी वेळ लागतो. महिन्यांच्या ऐवजी आठवड्यातून वॅक्सीन तयार करणे फायद्याचे ठरेल. जेणेकरून लवकरच चाचण्या होतील आणि वॅक्सीन लोकांपर्यंत पोहोचू शकेल.’

जगातील तंबाखू उत्पादकांनी यावेळी कोरोना वॅक्सीन तयार करण्याच्या शर्यतीत भाग घेतला आहे. फिलिफ मॉरिस इंटरनॅशनल मेडिकागो इन्कॉर्पोरेशन कंपनी पण तंबाखूवर आधारित वॅक्सीन तयार करण्यात गुंतली आहे. पुढील वर्षातील पहिल्या सहा महिन्यांत त्यांचे वॅक्सीन येईल, असा कंपनीचा दावा आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य वैज्ञानिका सौम्या स्वामीनाथन यांनी म्हटले आहे की, ‘सध्या जगात २४ वॅक्सीनच्या क्लिनिकल चाचण्या सुरू आहेत. त्यांच्या आतपर्यंतच्या यशाचा दर फक्त १० टक्के आहे. दरम्यान तंबाखूपासून वॅक्सीन तयार करणे अजब वाटत आहे. असे वाटते या वॅक्सीनला यश मिळेल. परंतु यामुळे शरीरात इतर प्रकारचे दुष्परिणाम देखील होऊ शकतात. कारण सिगारेटच्या ध्रुम्रपानामुळे कोविड-१९ रुग्णांची समस्या वाढत आहे.’


हेही वाचा – Corona Vaccine : सर्वात पहिली लस कोणाला?; विविध देशांमध्ये शोध सुरू


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -