घरताज्या घडामोडीFarmer Protest Live Update: - शेतकरी शिष्टमंडळ राजभवनावर राज्यपाल नसताना जाणार नाही-...

Farmer Protest Live Update: – शेतकरी शिष्टमंडळ राजभवनावर राज्यपाल नसताना जाणार नाही- अजित नवले

Subscribe

राजभवनावर राज्यपाल नसताना आम्ही जाणार नाही- अजित नवले


शेतकरी आंदोलन कर्त्यांचे पाच जणांचे शिष्ठमंडळ राजभवनाकडे रवाना, या शिष्टमंडळात

- Advertisement -

शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातोय- सचिन सावंत


शेतकऱ्यांचा मोर्चा राजभवनाकडे रवाना, शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ घेणार राज्यपालांच्या सचिवाची घेणार भेट, शेतकऱ्यांच्या मोर्चाला मुंबई पोलिसांनी अडवले, आंदोलक शेतकऱ्यांचे रस्त्यावर ठिय्या आंदोलन, मेट्रो सिनेमा चौकात शेतकऱ्यांना पोलिसांनी अडवले

- Advertisement -

पंतप्रधान मोदींनी शेतकरी आंदोलनाची कधी चौकशी केली का? पंजाबचा शेतकरी म्हणजे पाकिस्तानचा शेतकरी आहे का? केंद्र सरकारने कोणालाही विश्वास न घेता केंद्राने कायदा पास केला. पंतप्रधान मोदींनी कायदा आणताना सविस्तर चर्चा केली पाहिजे होती. पण ती झाली नाही. शेतकऱ्यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे आम्ही कृषी कायदा उद्धवस्त झाल्याशिवाय गप्प बसणार नाही, केंद्र सरकारच्या या नाकार्तेपणाचा आम्ही निषेध करतो- शरद पवार


कंगनाला भेटायला राज्यपालांना वेळ आहे, पण शेतकऱ्यांसाठी नाही- शरद पवार


पंजाब म्हणजे पाकिस्तान आहे का? त्यामुळे पंजाबचा शेतकरी पण देशाचा शेतकरी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना  उद्धवस्त केल्याशिवाय गप्प बसणार नाही, केंद्र सरकारला धडा शिकवला पाहिजे- शरद पवार


पंतप्रधान मोदींनी कायदा आणताना सविस्तर चर्चा केली पाहिजे, पंतप्रधान मोदींनी शेतकरी आंदोलनाची कधी चौकशी केली का?- शरद पवार


थंडी वाऱ्याचा विचार न करता शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे – शरद पवार


शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आपण एकत्र आलोत- शरद पवार


तीन कृषी कायदे भांडवलदार, नफेखोर साठेबाज व्यापाऱ्यांच्या फायद्याचे – बाळासाहेब थोरात


ऊसाला हमीभाव मिळतो, त्याप्रमाणे शेतीच्या प्रत्येक उत्पादनाला हमीभाव मिळाला पाहिजे, अशी शेकापच्या जयंत पाटील यांची मागणी


मोदींचे हम दो म्हणजे मोदी आणि शाहृ, आणि हमारे दो म्हणजे अंबानी आणि अदानी- कॉमरेड अशोक ढवळे अशोक ढवळे


भाजपाला विरोध करणारे सारे पक्ष एकाच मंचावर, मोदी सरकारने सारा देश विकायला काढला. रेल्वे, शिक्षण, हॉस्पीटल, संस्था, एअरपोर्ट विकले आता शेती आणि शेत जमीनी विकायला काढल्या आहेत. – कॉमरेड अशोक ढवळे अशोक ढवळे


शेतकरी दु:खी असेल तर देशात कोणीही आनंदात राहू शकणार नाही. ऊन, वारा, पाऊस झेलत शेकतरी मेहनत घेतोय. सारं धान्य उत्पन्न देशासाठी देतोय. त्यामुळे तिन्ही कृषी कायदे रद्द करा- अबू आझमी


आझाद मैदानावर जमलेल्या हजारो शेतकऱ्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यासाठी अनेक संस्थांनी मदतीचा हात पुढे केला आहे. दादर येथील गुरुद्वाराने शेतकऱ्यांसाठी तब्बल २५ हजार पुलावची पाकिटे, केळी, डाळ आणि चपातीची व्यवस्था केलीय. गुरुद्वारातर्फे दुपारच्या जेवणामध्ये केळी, डाळ-चपातीचे वाटप केले जाईल.


राज्यभरातील हजारो शेतकरी आंदोलनात सहभागी, शेतकऱ्यांना पाठींबा देण्यासाठी शेकापचे जयंत पाटील, काँग्रेस नेते भाई जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार, अजित पवार, जितेंद्र आव्हाड,


सत्तेचा माज असलेले मोदी सरकार- भाई जगताप


शेतकरी आंदोलनाला मविआचा पाठिंबा- अजित पवार


राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आझाद मैदानात दाखल


काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आझाद मैदानात दाखल झाले असून थोड्याच वेळात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार देखील उपस्थित राहणार आहे.


आझाद मैदानातील आंदोलनाला ‘पब्लिसिटी स्टंट’ म्हणणाऱ्या रामदास आठवले यांनी माफी मागावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसची केली आहे.


मुंबईनंतर राज्यात शेतकरी आंदोलनाला सुरुवात झाली असून राजू शेट्टी यांच्या नेतृत्त्वाखाली सांगलीत कृषी कायद्याविरोधात ट्रक्टर मोर्चाला सुरुवात झाली आहे.


आझाद मैदानात शेतकऱ्यांच्या सभेला सुरुवात झाली असून किसान सभेतून शेतकरी नेते अजिक नवले संबोधित करत आहेत.


शेतकऱ्यांना आंदोलनादरम्यान काळजी घ्यावी लागेल, कारण अद्याप मुंबईत कोरोना गेलेला नाही. अन्यथा कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ शकतो, ही काळजी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आहे असे स्पष्टीकरण शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिले.


किसान सभेने मुंबईत आंदोलन करण्याची गरज नाही. हे आंदोलन प्रसिद्धीसाठी आहे. कायदा सरकारने केला आहे, मागे घेण्याचा प्रश्न नाही. शेतकऱ्यांनी आंदोलन थांबवायला हवं अशी टीका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.


शेतकऱ्यांचे आंदोलन आज राजभवनावर धडक देणार आहे. मात्र या मोर्चाला आम्ही परवानगी दिलेली नाही. दक्षिण मुंबईत मोर्चाला परवानगी देता येत‌ नाही, असा माननीय न्यायालयाचा आदेश आहे, असं मुंबईचे सहपोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी म्हटलं.


मुंबईतील शेतकरी आंदोलनावर राज्यातील विरोधीपक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे. ‘ही सगळी ढोंगबाजी सुरू असून बहती गंगा में हाथ धोण्याचा हा प्रकार आहे’, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी निशाणा साधला आहे.


शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला भेटण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पाचची वेळ दिली. राज्यपाल सध्या गोव्यात असून संध्याकाळपर्यंत मुंबईत परतणार आहेत.


मुख्यमंत्र्यांना शेतकरी आंदोलनात सहभागी होऊ नये, अशी राष्ट्रवादीची भूमिका असल्याचे समोर आले आहे. एका मराठी वृत्तवाहिनीला याबाबत शरद पवारांच्या निकटवर्तीयांनी माहिती दिली आहे.


आज शेतकरी मोर्चा राजभवनात धडकणार आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक व माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सांगली-कोल्हापुरात ट्रॅक्टर आंदोलन केले जाणार आहे.


जगात अजूनही कोरोना व्हायरसचा कहर कायम आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, जगातील कोरोनाबाधितांची संख्या ९ कोटी ९७ लाख ६८ हजारांहून अधिक झाली आहे. यापैकी आतापर्यंत २१ लाख ३८ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला असून ७ कोटी १७ लाख ४१ हजारांहून अधिक जण कोरोनामुक्त झाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -