घरक्राइमCrime News : घरफोडीनंतर थेट विमानाने पोहोचले नेपाळला, 48 तासांत आंतरराष्ट्रीय गँगचा...

Crime News : घरफोडीनंतर थेट विमानाने पोहोचले नेपाळला, 48 तासांत आंतरराष्ट्रीय गँगचा पर्दाफाश

Subscribe

या गँगविरोधात अनेक पोलीस ठाण्यात घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे आणखी गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

कधी सोसायटी, कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करत, तर कधी हॉटेलमध्ये नोकरी करत घरफोडी करणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय नेपाळी गँगचा पर्दाफाश करण्यात आला आहे. वसई परिसरात या गँगने घरफोडी, लुटमार करत हौदोस घालता होता. यामुळे वसईतील माणिकपूर पोलिसांकडून या गँगचा शोध सुरु होता. घरफोडी करत विमान मार्गे नेपाळला पळू जात असतानाच अखेर त्यांना नेपाळ-भारत सीमेवर बेड्या ठोकण्यात आल्या आहे. माणिकपूर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शाखेला या गँगमधील तीन जणांना अटक करण्यात यश आले आहे. तर एक आरोपी फरार झाला आहे.

माणिकपूर गुन्हे शाखेच्या पथकाने या गँगला अटक करत वसईत आणून तात्काळ न्यायालयात हजर केले. यावेळी न्यायालयाने आरोपींना २० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या आरोपींकडून 124 ग्रॅम सोन्याचे दागिने, 6 हजार 800 ची रोकड, 3 मोबाईल असा एकूण 5 लाख 24 हजार 480 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. धरमराज दयाराम ढकाल उर्फ शर्मा, राजेश पदम जोशी उर्फ तप्तराज पदमराज देवेकोटा, अर्जुन उर्फ नरेश धरमराज ढकाल असे अटक केलेल्या नेपाळी गॅंगमधील सराईत गुन्हेगारांची नावे आहेत.

- Advertisement -

7 जानेवारीला वसईच्या सनसिटी परिसरात रात्रीच्या वेळी एका घरातील बाथरुमची लोखंडी ग्रिल तोडून घरफोडी झाली होती. चोरट्यांनी घरातील मौल्यवान वस्तू घेऊन पोबारा केला. या प्रकरणी नंतर माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी घटनेदरम्याचे परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. यावेळी सीसीटीव्ही फुटेजमध्ये सोसायटीमधील सुरक्षा रक्षक आणि त्याचे इतर सहकारी कैद झाले होते. दरम्यान ही गँग घरफोडी करुन नेपाळच्या दिशेने रवाना होत होती. तपास पथकालाही आरोपी नेपाळच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती मिळाली होती. यानंतर माणिकपूर पोलीस थेट विमान प्रवास करत नेपाळ बॉर्डरवर पोहचले. भारताची बॉर्डर क्रॉस करुन नेपाळमध्ये पोहोचण्याआधीच पोलिसांनी नेपाळ बॉर्डरवरून अवघ्या 48 तासात तिन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या. मात्र यातील एक आरोपी फरार झाला आहे. या गँगविरोधात अनेक पोलीस ठाण्यात घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे आणखी गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.


भारतीय वंशाची व्यक्ती ब्रिटनच्या पंतप्रधानपदी? बोरिस जॉन्सनवर राजीनाम्याचा दबाव

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -