कोरोना महामारी, अर्थचक्र मंदावल्याने संकट गडद; ‘इतक्या’ कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा

मागील काही महिन्यांपासून जगभरातील बड्या कंपन्या हजारोंच्या संख्येने कर्मचारी कपात करत आहेत. कोरोना काळानंतर सर्वच देशांचं अर्थचक्र मंदावल्याने अनेक कंपन्यांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळेच कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात कपात केली जात असल्याचे बोलले जात आहे.

मागील काही महिन्यांपासून जगभरातील बड्या कंपन्या हजारोंच्या संख्येने कर्मचारी कपात करत आहेत. कोरोना काळानंतर सर्वच देशांचं अर्थचक्र मंदावल्याने अनेक कंपन्यांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळेच कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात कपात केली जात असल्याचे बोलले जात आहे. सध्या सुरू असलेली कर्मचारी कपात ही कोरोना काळात भरती केलेल्या कर्मचाऱ्यांची होत असल्याचेही काहींच म्हणणे आहे. (Crisis deepens due to corona pandemic economic cycle slowdown Place on the employment of employees)

जगभरात 2020 साली कोरोना या जीवघेण्या आजाराने थैमान घातले होते. त्यामुळे जगातील अनेक देशांनी लॉकडाऊनचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यावेळी ई-कॉमर्स आणि आयटी क्षेत्रातील कंपन्यांचे व्यवहार सुरू होते. कारण कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ऑनलाइन व्यवहार सुरू होते. त्यावेळी अशा कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात भरती करण्यात आली होती. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव घटल्यानंतर परिस्थिती हळूहळू मूळ पदावर आली. परिणामी, ई-कॉमर्स आणि आयटी क्षेत्रातील कंपन्यांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागला. याच आर्थिक संकटाचा फटका आता कर्मचाऱ्यांना बसतो आहे. कारण बऱ्याच कंपन्यांनी कर्मचारी कपात केली असून, इतर काही कंपन्या कर्मचारी कपातीच्या तयारीत आहेत.

गतवर्षी सुरू झालेली कर्मचारी कपात अजूनही कायम आहे. जानेवारी महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात 91हून अधिक कंपन्यांनी 24 हजारांहून अधिक तंत्रज्ञान कर्मचाऱ्यांना कामावरून काढले. अॅमेझॉन, कॉइनबेस, सेल्सफोर्स आणि इतर कंपन्यांनी 24,151 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले. तर, मेटा, ट्विटर, ओरॅकल, एनव्हीडिया, स्नॅप, उबर, स्पॉटिफाई, इंटेल आणि सेल्सफोर्ससह इतर कंपन्यांनी जवळपास 1 लाख 53 हजार 110 कर्मचाऱ्यांना कंपनीतून काढून टाकले होते.

कोरोना महामारीनंतर भारतासह जगभरात अनेकांच्या नोकऱ्यांवर गदा आली असतानाच देशात बेरोजगारीने गेल्या 16 महिन्यांतील उच्चांक गाठल्याचे समोर आले. नोव्हेंबर 2022मध्ये देशात 8 टक्के असलेला बेरोजगारीचा दर डिसेंबर 2022मध्ये 8.3 टक्क्यांवर गेला.

शहरी भागातील बेरोजगारीचा दर

 • नोव्हेंबर 2022 मध्ये बेरोजगारीचा दर 8.96 टक्के इतका होता.
 • डिसेंबर 2022 मध्ये बेरोजगारीचा दर 10.09 टक्क्यांवर गेला आहे.

ग्रामीण भागातील बेरोजगारीचा दर

 • नोव्हेंबर 2022 मध्ये बेरोजगारीचा दर 7.55 टक्के इतका होता.
 • डिसेंबर 2022 मध्ये बेरोजगारीचा दर 7.44 टक्के होता.

कंपनी आणि कर्मचारी कपात

 • गुगल : गूगलची पालक कंपनी असलेल्या अल्फाबेट कंपनीकडून तब्बल 12 हजार कर्मचाऱ्यांची कपात.
 • स्विगी : फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म स्विगीकडून 380 कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची घोषणा.
 • ट्विटर : एलन मस्क यांनी ट्विटर कंपनी ताब्यात घेतल्यापासून साधारण 50 टक्के कर्मचारी कपात.
 • नेटफ्लिक्स : नेटफ्लिक्सल कंपनीकडून दोन टप्प्यात कर्मचारी कपात.
 • मेटा : फेसबुकची मूळ कंपनी असलेली मेटा कंपनी मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात करण्याच्या तयारीत.
 • अॅमेझॉन : अॅमेझॉन कंपनीने 18 हजार कर्मचाऱ्यांना काढले.
 • सिगेट टेक्नॉलॉजिज : हार्ड-ड्राइव्हनिर्मितीतल्या महत्वाच्या कंपनीकडून 3000 कर्मचारी कपात.
 • इंटेल : जवळपास 20 टक्के कपातीची शक्यता.
 • मायक्रोसॉफ्ट : मायक्रोसॉफ्ट कंपनीकडून 10 हजार कर्मचाऱ्यांची कपात.
 • कॉइनबेस : अमेरिकेतील कॉइनबेस कंपनीने 18 टक्के कर्मचारी केले कमी.
 • स्नॅप : 20 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा निर्णय.
 • शॉपिफाय : ऑनलाईन शॉपिंग कंपनी शॉपिफायकडून 10 टक्के कर्मचारी कपात.
 • स्ट्राईप : डिजिटल पेमेंट कंपनी स्ट्राईपची 14 टक्के कपातीची तयारी.
 • ओपनडोअर : रिअल इस्टेटमधील ओपनडोअरने 18 टक्के कर्मचारी केले कमी.
 • शेअर चॅट : डिसेंबरमध्ये 100 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढले, आता ५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार.
 • Dunzo : किराणा डिलिव्हरी स्टार्टअप Dunzo कंपनीने 3 टक्के कर्मचार्‍यांना काढले.
 • ओला : ओलाने टेक आणि उत्पादन टीममधून सुमारे 200 कर्मचाऱ्यांना कामावरून काढले.

हेही वाचा – Layoffs 2023 : गूगलची पालक कंपनी अल्फाबेटने 12 हजार कर्मचाऱ्यांना काढले