घरCORONA UPDATEVideo - क्वारंटाईन सेंटरमध्ये अश्लील डान्स, व्हिडिओ व्हायरल!

Video – क्वारंटाईन सेंटरमध्ये अश्लील डान्स, व्हिडिओ व्हायरल!

Subscribe

अश्लील डान्सचा हा व्हायरल व्हिडिओ समस्तीपूर जिल्ह्यातील विभूतीपूरा येथील क्वारंटाईन सेंटरचा आहे.

लॉकडाऊनमुळे बिहारमध्ये दररोज हजारो परप्रांतीय कामगार आपल्या घरी परत येत आहेत. अशा स्थलांतरितांमध्ये कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे सरकारने त्यांना  क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवले आहे. प्रत्येक जिल्ह्यात त्यांच्यासाठी विलगीकरण कक्ष तयार करण्यात आले आहेत. परंतु समस्तीपूर जिल्ह्यातील एका क्वारंटाईनसेंटरमधील एक अश्लील व्हिडिओ समोर आला आहे. क्वारंटाईन सेंटरमधील मजुरांच्या करमणूकीसाठी डान्स ठेवले जात आहेत. या अश्लील डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

अश्लील डान्सचा हा व्हायरल व्हिडिओ समस्तीपूर जिल्ह्यातील विभूतीपूरा येथील क्वारंटाईन सेंटरचा आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर असं म्हटलं जात आहे की, व्कारंटाईन सेंटरमध्ये  राहणारे आणि काही प्रतिनिधींनी एकत्रितपणे हा कार्यक्रम आयोजित केला होता. सर्व नियम धाब्यावर बसवून आयोजीत केलेल्या या कार्यक्रमातील अश्लील नृत्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर आता जिल्हा प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले आहेत.

- Advertisement -

सरकारी शाळेच्या परिसरातील क्वारंटाईन सेंटरमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या व्हिडिओबद्दल बोलताना प्रभारी अधिकारी राजीव रंजन सिन्हा म्हणाले की, असा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी कोणालाही परवानगी दिली जाऊ शकत नाही. याची चौकशी केली जाईल. लोकांचे मनोरंजन करण्यासाठी क्वारंटाईन सेंटरमध्ये टिव्हीची व्यवस्था करण्यात आली आहे.


हे ही वाचा – जुगाड! मजुरांनी हातगाडी सायकलला जोडून केला हरियाणा ते प्रयागराजपर्यंतचा प्रवास

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -