घरदेश-विदेश26 जानेवारीपूर्वी भारतात दहशतवादी हल्ल्याचा मोठा कट उधळला, ISI दोन अतिरेक्यांना अटक

26 जानेवारीपूर्वी भारतात दहशतवादी हल्ल्याचा मोठा कट उधळला, ISI दोन अतिरेक्यांना अटक

Subscribe

भारतात प्रजासत्ताक दिनापूर्वी ( 26 जानेवारी) मोठा दहशतवादी हल्ला करण्याचा कट आयएसआय अतिरेकी संघटनेकडून आखण्यात आला होता, मात्र दिल्ली पोलिसांनी दहशतवादी हल्ल्याचा हा कट उधळून लावला आहे. दिल्ली पोलिसांनी याप्रकरणी दोन अतिरेक्यांना अटक केली आहे. हे दोघेही ISI साठी काम करत असल्याचे माहिती चौकशीतून समोर आली आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या या कामगिरीमुळे प्रजासत्ताक दिनापूर्वी देशात दहशतवादी हल्ल्याचा मोठा कट हाणून पाडता आला.

जहांगीरपुरी येथून अटक केलेल्या संशयितांची दिल्ली पोलिसांनी चौकशी केल्यानंतर समोर आले की, हे दोघांचे हरकत उल अन्सार आणि खलिस्तान टायगर फोर्सशी संबंध आहेत. तसेच दोघेही दहशतवादी गट पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा ISI च्या मार्गदर्शनाखाली तयार झाले आहेत. यांचा उद्देश भारतात दहशत निर्माण करणं आहे, असही दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने सांगितलं

- Advertisement -

अटक केलेल्या संशयित दहशतवाद्यांकडून हातबॉम्ब जप्त करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांनी भालस्व डेअरीवर छापेमारी केली त्यावेळी या दोन संशयित दहशतवाद्यांना अटक केली. दोघांची चौकशीतून एका हत्याचा उलघडा झाला आहे. दोघांच्या माहितीवरून भालस्वा येथील नाल्यातून एका व्यक्तीचा मृतदेहाचे तीन अवशेष आढळून आले आहे. या दोघांनीच ही हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे.

दरम्यान दिल्लीत यापूर्वी देखील काही दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे प्रजासत्ताक दिनापूर्वी दहशवतवाद्यांच्या भारताविरोधी वाढत्या हालचाली पाहता आता तपास यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. अनेक महत्त्वाच्या ठिकाणी आता सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.


मुंबईत 2 वर्षांनंतर टाटा मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात, पहाटेपासून मोठ्या संख्येने स्पर्धक सहभागी

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -