घरदेश-विदेशमहिला गुरुच्या आशीर्वादाने पोलीस अधिकाऱ्याची बदली

महिला गुरुच्या आशीर्वादाने पोलीस अधिकाऱ्याची बदली

Subscribe

महिला गुरुकडून आर्शिवाद घेत असतानाचा फोटो व्हायरल झाल्यामुळे दिल्ली पोलीसमधील एका अधिकाऱ्यावर बदलीची कारवाई करण्यात आली आहे. इंद्रपाल असे या अधिकाऱ्याचे नाव असून तो नवी दिल्ली जनकपूर येथील पोलीस ठाण्यातील स्टेशन हाउस ऑफिसर म्हणून कार्यरत होता. पोलीस गणवेशात महिला गुरुकडून अशीर्वाद घेत असताना प्रसार माध्यमांमध्ये झळकल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. नमिता आचार्य असे या महिला गुरुचे नाव आहे. इंद्रपाल हा तिचा भक्त असून पोलीस गणवेशात असताना मालिश घेत होता. या प्रकरणावर उत्तर देतांना इंद्रपालने सांगितले की, “मागील काही दिवसांपासून मानसिक तणावात होतो. तणाव दूर करण्यासाठी महिला गुरुकडून एनर्जी हिलींग घेत होतो. हे आशीर्वादाप्रमाणे आहे.” नमिता आचार्य ही एका हाय प्रोफाईल गुरु असून अनेक आयपीएस अधिकारी तिचा आशिर्वाद घेतात.

- Advertisement -

यापूर्वीही घडली अशीच घटना
यापूर्वीही २०१७ ला पोलीस अधिकाऱ्यांने स्वयंघोषीत राधे माँ सोबत फोटो काढला होता. ज्यामध्ये संबधीत पोलीस अधिकारी हा राधे माँ समोर हाथ जोडून उभे आहे. तसेच राधे माँ ही त्याच्या खूर्चीवर बसून त्याला आशीर्वाद देतांना दिसली. फोटो व्हायरल झाल्यामुळे या अधिकाऱ्यावरही बदली ची कारवाई करण्यात आली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -