घरदेश-विदेशदिल्लीची प्रसिध्द पॉप सिंगर शिवानी भाटियाचा कार अपघातात मृत्यू

दिल्लीची प्रसिध्द पॉप सिंगर शिवानी भाटियाचा कार अपघातात मृत्यू

Subscribe

शिवानी आणि निखिल आग्रा येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी जात असताना ही घटना घडली. यमुना एक्स्प्रेस वेवर एका कारला शिवानी यांच्या कारने मागून जोरदार धडक दिली.

दिल्लीच्या एका प्रसिध्द पॉप सिंगर शिवानी भाटियाचा कार अपघातात दुर्देवी मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशच्या मथुरा जनपद येथे ही घटना घडली आहे. यमुना एक्स्प्रेस वेवर दोन कारमध्ये अपघात झाला. या अपघातामध्ये शिवानी भाटियाचा मृत्यू झाला तर तिचा पती निखिल भाटिया हा गंभीर जखमी झाला आहे. शिवानी आणि निखिल आग्रा येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी जात असताना ही घटना घडली. यमुना एक्स्प्रेस वेवर एका कारला शिवानी यांच्या कारने मागून जोरदार धडक दिली.

अशी घडली घटना 

पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, शिवानी भाटिया यांची कार भरधाव वेगात होती. दरम्यान यमुना एक्स्प्रेस वेवर एका कारला शिवानी यांच्या कारने मागून जोरात धडक दिली. हा अपघात ऐवढा भीषण होता की, या अपघातामध्ये शिवानी यांच्या गाडीचा चक्काचूर झाला आहे. घटनास्थळावर असलेल्या नागरिकांनी आणि पोलिसांनी शिवानी आणि तिच्या पतीला जखमी अवस्थेत कसे तरी कारमधून बाहेर काढले आणि नजीकच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. उपचारा दरम्यान, शिवानी हिचा मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेल्या तिच्या पतीवर उपचार सुरु आहे.

- Advertisement -

आग्राला कार्यक्रमाला जात होती 

सिंगर शिवानी भाटिया बिहारच्या सीतामढी येथे राहणारी होती. मात्र गेल्या अनेक वर्षापासून ती दिल्लीच्या लाजपतनगर येथे कुटुंबियांसोबत राहत होती. शिवानी दिल्ली- नोएडा येथेच जवळच्या कार्यक्रमात सहभागी व्हायची. मात्र यावेळी तिला आग्राच्या एका कार्यक्रमात बोलावण्यात आले होते. त्यामध्ये सहभागी होण्यासाठी जात असताना ही घटना घडली. या घटनेमुळे तिच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तिच्या कुटुंबियांनी तिच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यास देखील नकार दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -