घरदेश-विदेशधनत्रयोदशी निमित्त देशात तब्बल ३० टन सोन्याची खरेदी

धनत्रयोदशी निमित्त देशात तब्बल ३० टन सोन्याची खरेदी

Subscribe

यंदा धनत्रयोदशीनिमित्त देशात तब्बल ३० टन सोन्याची खरेदी झाली आहे, अशी माहिती इंडिया बुलियन एंड ज्वेलर्स असोसिएशन (आयबीजेए) चे राष्ट्रीय सचिव सुरेंद्र मेहता यांनी दिली.

धनत्रयोदशीनिमित्त देशातील जनता मोठ्या संख्येने सोने खरेदी करते. पण मागील काही वर्षांपासून सोन्याच्या वाढलेल्या भावामुळे सोने खरेदीमध्ये घट झाली होती. यंदाही सोने खरेदीवर वाढलेल्या किंमतींचे सावट होतेच. पण तरीदेखील यंदा धनत्रयोदशीनिमित्त देशात तब्बल ३० टन सोन्याची खरेदी झाली आहे, अशी माहिती इंडिया बुलियन एंड ज्वेलर्स असोसिएशन (आयबीजेए) चे राष्ट्रीय सचिव सुरेंद्र मेहता यांनी दिली.

काय म्हणाले सुरेंद्र मेहता?

याबाबतची माहिती देताना सुरेंद्र मेहता म्हणाले की, “मागील वर्षी ४० टन सोन्याची खरेदी झाली होती. पण यंदा सोन्याचे भाव गगनाला भिडल्याने यंदा २० टन सोन्याची खरेदी होईल असा अंदाज होता. यंदा सोन्याच्या विक्रीत २५ टक्के घट झाली. देशांतर्गत बाजारात सोन्याची मागणी घटल्याने सोन्याची एवढी विक्री होईल, अशी अपेक्षासुद्धा नव्हती.”

- Advertisement -

ते पुढे म्हणाले की, “आतंरराष्ट्रीय बाजारात या वर्षी सोन्याचा भाव गगनाला भिडला होता. त्यातच भारतातही महाग धातूंवर आयात शुल्क वाढवण्यात आले. परिणामी देशांतर्गत बाजारात सोन्याचे भाव वाढले. त्यामुळे सणासुदीच्या तोंडावर देशात सोन्याच्या मागणीत घट झाल्याचे चित्र होतं. पण मागील तीन-चार दिवसांपासून ज्या प्रमाणे खरेदी सुरु झाली, त्यामुळेच धनत्रयोदिवशी जवळपास ३० टन सोन्याची विक्री झाली.

यापूर्वी ८ ऑक्टोबर रोजी मेहता म्हणाले होते की, “मागणीत घट झाल्याने यंदा देशातील सराफा बाजारात धनत्रयोदशी निमित्त २० टन सोन्याची विक्री होईल.” केडिया अॅडवायजरीचे डायरेक्टर अजय केडिया यांनी देखील मागील वर्षीच्या तुलनेत यंदा देशातील सराफा बाजारात २५ टक्के कमी खरेदी झाल्याचे म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -