घरताज्या घडामोडीअमेरिकेत ४० वर्षांपूर्वी सापडलेला AID's चा पहिला रूग्ण होता होमोसेक्शुअल

अमेरिकेत ४० वर्षांपूर्वी सापडलेला AID’s चा पहिला रूग्ण होता होमोसेक्शुअल

Subscribe

डॉ एंथनी फौची यांना LGBTQ आंदोलकांनी ठरविले होते खूनी

कोरोना काळामध्ये अमेरिकेतील बायडन प्रशासनातील मुख्य आरोग्य सल्लागार डॉ अॅंथनी फौची यांचा उल्लेख Covid-19 च्या निमित्ताने येण्याआधीच आणखी एका संकटातही त्यांचे योगदान हे महत्वाचे ठरले होते. जेव्हा १९७० च्या काळात AIDS च्या संकट कोसळले होते, त्या काळातही या एड्स विरोधीच्या लढ्यातही फौची यांची कामगिरी उल्लेखनिय अशीच होती. अमेरिकेत पहिल्या AIDS चा रूग्ण सापडण्याच्या घटनेचा ४० वर्षे पुर्ण झाली. सेंटर्स फॉर डिझिज कंट्रोल एण्ड प्रिवेन्शनला चार दशकांपूर्वी पहिला रूग्ण सापडला होता. कोणताही आजार नसलेल्या २९ ते ३६ वयोगटाच्या चार पुरूषांमध्ये एक नव्या प्रकारचा अशक्तपणा आढळून आला होता. हे चारही जण एक्टीव्ह होमोसेक्शुअल्स होते. लॉस एंजेलस येथे राहणाऱ्या या चारही जणांमध्ये कोणत्याही प्रकारचा आजार किंवा व्याधी असा इतिहास नसताना त्यांना मोठ्या प्रमाणात अशक्तपणा आला होता. अशा प्रकारचे रूग्ण आढळण्याची ही पहिलीच घटना ५ जून १९८१ रोजी आढळली होती.

या चारही जणांना आलेला अशक्तपणा हे सामान्य नव्हता असे मत अहवालातून समोर आले होते. त्यांच्या एकत्रित राहण्याच्या आणि होमोसेक्युएलिटी लाईफस्टाईलमुळेच ही परिस्थिती निर्माण झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला होता. अतिशय कमी लोकांमध्ये आढळणारा असा दुर्मिळ न्यूमोनियानेही हे रूग्ण ग्रासले होते. त्यावेळी डॉ फोची यांची पहिली प्रतिक्रिया होती ती म्हणजे मला कळत नाहीए, पण हा नक्कीच नवीन आजार आहे. फौची हे गेली ३७ वर्षे नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ हेल्थ (NIH) मध्ये काम करत आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांना लॅबोरेटरी ऑफ इम्युनोरेग्युलेशनच्या प्रमुख अशा संचालकपदी नेमण्यात आले. या चारही व्यक्तींच्या आलेल्या अहवालानुसार या आजाराला होमोफोबिया असे सुरूवातीला म्हटले गेले. सेक्सच्या माध्यमातून संक्रमित होणारा आजार म्हणून सुरूवातीला त्याची व्याख्या केली गेली, कालांतराने ही व्याख्या खरी ठरली. तसेच रक्ताच्या माध्यमातून, संसर्ग असलेल्या इंजेक्शनच्या नीडल्सच्या माध्यमातूनही हा आजार संक्रमित होत असल्याचे पुढे निष्पन्न होत गेले. फौची यांच्या कार्यकाळातील बराचसा काळ हा AIDS रूग्णांच्या सेवेत गेला आहे.

- Advertisement -

अनेक रूग्णांना मी उपचार दिले आहेत. त्यामध्ये अनेक रूग्ण हे उपचार घेऊन बरे झाले, तर अनेकांना माझ्या डोळ्यासमोर मरण येतानाही मी पाहिले आहे, असे त्यांनी CNN ला दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले आहे. NIH मध्ये कार्यरत असताना माझ्या आय़ुष्यातील अनेक वर्षे ही मी एड्सच्या रूग्णांसाठी चांगले उपचार कसे देता येतील यासाठी घालवली आहेत. ही वर्षे माझ्या आयुष्यातील सगळ्यात गडद आणि काळी अशी वर्षे आहेत. त्याला कारण म्हणजे मी ज्या रूग्णांवर उपचार केले, त्यामध्ये एक एक रूग्ण दगावताना मी पाहिले आहे. हा सगळा अतिशय भीषण अनुभव मी या कालावधीत घेतला असल्याचेही त्यांनी सांगितले.

अमेरिकेत FDA ने पहिल्यांदाचा एड्सवर उपचारासाठीचे औषध हे १९८७ मध्ये तयार केले. त्यानंतर जवळपास एक दशकानंतर एड्सवर अतिशय प्रभावी अशी उपचार पद्धती समोर आली. highly active antiretroviral therapy (HAART) थेरपीच्या माध्यमातून अनेक औषधांवर आधारीत ही उपचार पद्धती आहे. पण एड्सवर लस आणण्यासाठी अद्यापही संशोधकांमार्फत संशोधन सुरू आहे. एड्सचा संसर्ग सुरू झाल्यानंतर सुरूवातीच्या काळात LGBTQ अधिकारांसाठीचे कार्यकर्ते यांच्याकडून फौची आणि NIH विरोधात खूपच असंतोषाचे वातावरण होते. उपचार पद्धती लवकर उपलब्ध करून न देण्यासाठीचा हा रोष होता. जवळपास ५० ते १०० कार्यकर्त्यांनी मिळून फौची यांच्याविरोधात आंदोलन केले होते. सरकार आमच एकत नाही, म्हणूनही त्यांची नाराजी होती. फौची यांना काही आंदोलकांनी खूनी आणि मुर्ख असेही म्हटल्यानंतर त्या उल्लेखाच्या बातम्याही झाल्या होत्या.

- Advertisement -

जगभरात एड्सने ३ कोटीहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये एकट्या अमेरिकेतील ७० लाख जणांचा समावेश आहे. पहिल्यांदा लागण झालेल्या त्या पाच जणांचाही आकडा या अमेरिकेतील बळींच्या आकड्यात आहे. सध्याच्या कोरोनाच्या महामारी इतकाच महाकाय असा एड्सचा आजार त्यावेळी वाटत होता. अनेक वर्षांच्या गुंतवणुकीनंतरच यावर उपचार पद्धती विकसित करणे शक्य झाले. त्यामध्ये क्लिनिकल बायोमेडिकल रिसर्चही समावेश होता. या सगळ्या प्रक्रियेत अनेकदा अपयशही आले. पण आता किमान उपचार उपलब्ध आहेत. यापुढच्या काळात एड्सवरही लस लवकरात लवकर येणे गरजेचे आहे.

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -