घरदेश-विदेशइस्लामाबादमध्ये भारतीय उच्चायुक्तालयाच्या कंपाऊंडमध्येही ड्रोन; भारत संतप्त

इस्लामाबादमध्ये भारतीय उच्चायुक्तालयाच्या कंपाऊंडमध्येही ड्रोन; भारत संतप्त

Subscribe

ड्रोन आढळून येण्याच्या घटना काही थांबायचं नाव घेत नाहीये. जम्मूमधील ड्रोनच्या माध्यमातून झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आता हे ड्रोन पाकिस्तानच्या इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तालयाच्या कंपाऊंडमध्ये आढळून आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारताने या प्रकरणाकडे गांभीर्याने विचार करून पाकिस्तान सरकारवर कठोर आक्षेप घेतला आहे, परंतु पाकिस्तानकडून त्याचे काहीच उत्तर देण्यात आल्याचे दिसत नाही. तर दुसरीकडे सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) जवानांनी जम्मू-काश्मीरच्या अरनिया सेक्टरमधील आंतरराष्ट्रीय सीमेजवळ आज शुक्रवारी पहाटे साडेचार वाजता पाकिस्तानी ड्रोनवर गोळीबार करून त्याला पळवून लावलं.

जम्मू एअरफोर्स स्टेशनवर ड्रोन हल्ल्यानंतर ५ दिवसांत ही तिसरी वेळ आहे. ज्यात पाकिस्तानी ड्रोनने भारतीय हद्दीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, २७ जून रोजी झालेल्या हल्ल्याची योजना पाकिस्तानमध्ये तयार करण्यात आली असून त्यामागे लष्कर-ए-तैयबाचे प्रमुख हाफिज सईद आणि आयएसआय यांचा हात आहे.  हवाई दलाच्या स्टेशनवर हल्ला झाल्यानंतर दुसर्‍याच दिवशी जम्मूमधील कालूचक मिलिटरी स्टेशन जवळ दोन ड्रोनही दिसले. लष्कराच्या जवानांनी गोळीबार करताच तेथील ड्रोनही तेथून दिसेनासे झाले. पहिला ड्रोन कालूचक मिलिटरी स्टेशनजवळ रात्री पावणे बारा वाजता आणि दुसरा दुपारी पावणे तीन वाजता आढळून आला. ड्रोनचा वापर करून भारतीय सैन्य तळावर हा करण्यात आलेला पहिला हल्ला होता.

- Advertisement -

दरम्यान, सध्या जम्मूमधील हवाई दलाच्या स्टेशनवर झालेल्या हल्ल्याची एनआयए चौकशी करत आहे. ड्रोन हल्ल्यांचा सामना करण्यासाठी भारताला एक यंत्रणा आणि तंत्रज्ञान सापडले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, लवकरच जम्मू एअरफोर्स स्टेशनसारख्या दहशतवादी ड्रोन हल्ल्यांचा सामना करण्यासाठी कडक धोरण तयार केले जाणार आहे. पंतप्रधान मोदींनी मंगळवारी उच्चस्तरीय बैठक घेतली, ज्यामध्ये स्फोटकांनी सज्ज असलेल्या या ड्रोन्सच्या दहशतवादी हल्ल्याला सामोरे जाण्यासाठी सर्वसमावेशक ड्रोन धोरण तयार करण्यावर चर्चा करण्यात आली, जेणेकरून भविष्यात दहशतवादी ड्रोनने हल्ले करू शकणार नाही.


केंद्राने पेट्रोलियम पदार्थांवर Customs & Excise Duty तून कमावले ४.५१ लाख कोटी!

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -