घरताज्या घडामोडीकोरोनाच्या संकटात युरोपातील मुले 'या' आजाराचे शिकारी

कोरोनाच्या संकटात युरोपातील मुले ‘या’ आजाराचे शिकारी

Subscribe

संपूर्ण जग कोरोना विषाणूच्या संकटाशी सामना करत आहे. मात्र याचदरम्यान अनेक देशात वेगवेगळे आजार उद्भवताना दिसत आहे. अशी परिस्थितीत युरोपमध्ये झाली आहे. युरोपमध्ये या कोरोना विषाणूच्या संकटात एक आजार उद्भवला आहे. यामुळे १२ ब्रिटिश मुले या आजाराने ग्रस्त झाली आहेत. या मुलांच्या शरिराच्या चारही बाजूला लाल रंगाच्या पुरळ येत असल्याचे दिसू येत आहे. या आजारामुळे सगळ्यांमध्ये भीती पसरली असून डॉक्टरांना देखील हा आजार काय आहे? या आजाराचा संबंध कोरोना विषाणूशी आहे का? असे प्रश्न निर्माण झाला आहे.

कावासाकी आजाराप्रमाणे हा आजार असल्याचा विश्वास काही डॉक्टरांचा आहे. पाच वर्षांखालील मुलांना कावासाकी आजार होतो. या आजाराला म्यूकोकुटनेस लिम्फ नोड सिंड्रोम (Mucocutaneous Lymph Node Syndrome) देखील म्हणतात.

- Advertisement -

या आजारामध्ये मुलांना सतत ताप येत असतो. डोळे लाल होतात. घसा आणि जबडाभोवती सूज येणे, हृदयाचे स्नायू व्यवस्थित काम करत नाहीत, ओठ फाटतात, लाल त्वचेवर पुरळ येतात, सांधेदुखी, हात पाय आणि बोटांना सूज येणे आणि डायरिया असे या आजारामध्ये होते.

- Advertisement -

कावासाकी आजारामुळे मुलांना डायरिया होतो. युरोपच्या नॅशनल हेल्थ मिशनने सांगितले आहे की, ज्या मुलांमध्ये अशाप्रकारची लक्षणे दिसली आहेत, त्यांना त्वरित रुग्णालयात घेऊ जा. तपासणी करा आणि उपचार करा. कावासाकी या आजारावर मात करण्यासाठी इंट्रावीनस इम्यूनोग्लोबुलिन अँटीबॉडी आणि एस्पिरिन ही दोन औषधे आहेत. मुलांना बघून डॉक्टर म्हणाले की, मुलांच्या शरिरातील ताप तपासल्यावर असे वाटते की, त्यांच्या नसामध्ये रक्तच नाही आहे.

पहिल्यांदा हा आजार युके मधून आला होता. १२ रुग्ण आढळले होते. यानंतर फ्रान्स आरोग्यमंत्री ऑलिव्हियर वेरान यांनी सांगितले की, त्याच्या देशात या आजाराने १५ मुले ग्रस्त आहेत. इतकेच नाही तर स्पेन, इटली, स्वित्झर्लंड आणि अमेरिकेत देखील या आजाराने ग्रस्त असलेले मुले आढळली आहेत.


हेही वाचा – खुशखबर! मुंबईसह या राज्यात सिलेंडर झाले स्वस्त, जाणून घ्या नवे दर


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -