घरदेश-विदेशबंगालमध्ये पुन्हा 'खेला होबे', ममता बॅनर्जी भवानीपूरमधून पोटनिवडणूक लढणार

बंगालमध्ये पुन्हा ‘खेला होबे’, ममता बॅनर्जी भवानीपूरमधून पोटनिवडणूक लढणार

Subscribe

३० सप्टेंबरला होणार पोटनिवडणूक, ममता बॅनर्जी भवानीपूरमधून लढणार

पश्चिम बंगालमधील बहुप्रतिक्षित पोटनिवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. भारतीय निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालमधील तीन आणि ओडिशामधील एका जागेच्या पोटनिवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. यानुसार, भवानीपूर विधानसभेच्या पोटनिवडणूक ३० सप्टेंबरला होणार असून ३ ऑक्टोबरला मतमोजणी होईल. या जागेवर ममता बॅनर्जी लढणार आहेत.

पश्चिम बंगालमधील प्रतिष्ठेची बनलेली विधानसभा निवडणूक ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेस पक्षाने जिंकली. पश्चिम बंगालमध्ये विजय मिळवला असला तरी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना नंदीग्राममधून पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. त्यामुळे त्यांना सहा महिन्यात विधानसभेवर निवडून जाणे आवश्यक होते. यासाठी त्या भवानीपूरमधून निवडणूक लढवणार होत्या. यासाठी भवानीपूरमधील तृणमूल काँग्रेसचे आमदार शोभनदेव चट्टोपाध्याय यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे भवानीपूरमध्ये ३० सप्टेंबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाने आज (शनिवार) दुपारी ही माहिती दिली.

- Advertisement -

पश्चिम बंगालच्या समसेरगंज, जंगीपूर आणि ओडीशाच्या पिपलीमध्येही ३० सप्टेंबरलाच पोटनिवडणूक होणार आहे. तसेच निवडणूक आयोगाने कोविड -१९ ची परिस्थिती पाहता इतर ३१ जागांच्या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. घटनात्मक आवश्यकता आणि पश्चिम बंगालच्या विशेष विनंतीचा विचार करून, विधानसभा मतदारसंघ १५९ -भवानीपूरसाठी पोटनिवडणूक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून अत्यंत कठोर निकष लावले गेले आहेत, असे निवडणूक आयोगाने सांगितलं आहे.

ममता बॅनर्जी यांनी उपस्थित केले होते प्रश्न

ममता बॅनर्जी यांनी पोटनिवडणुकीसंदर्भात प्रश्न उपस्थित केले होते. बंगालमध्ये कोविड-१९ संसर्गाचा दर १.५ टक्क्यांवर आला आहे आणि पोटनिवडणुकीसाठी परिस्थिती अनुकूल आहे, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -