घरदेश-विदेशमोदी सरकारने पोलिसांच्या बंडाच्या भीतीनेच कश्मीर केंद्रशासित केलं--माजी राज्यपाल मलिक यांचा खळबळजनक...

मोदी सरकारने पोलिसांच्या बंडाच्या भीतीनेच कश्मीर केंद्रशासित केलं–माजी राज्यपाल मलिक यांचा खळबळजनक दावा

Subscribe

मलिक यांनी भाजप सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

पुलवामा हल्ला हा सरकारच्या चुकीमुळेच झाल्याचा गंभीर आरोप जम्मू कश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक Satyapal Malik यांनी केल्याने देशभरात खळबळ उडाली आहे. द वायर या वृत संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत मलिक यांनी भाजप सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यावेळी मलिक यांनी कश्मीरमधील पोलीस सरकारविरोधात बंड करतील अशी भीती वाटत असल्यानेच मोदी सरकारने ३७० कलम हटवल्याचा दावा केला आहे. मलिक यांच्या या खळबळजनक दाव्यांमुळे राजकीय वातावरणही तापले आहे.

सत्यपाल मलिक ज्यावेळी जम्मू कश्मीरचे राज्यपाल होते त्यावेळी केंद्रात असलेल्या मोदी सरकारने कश्मीरमधून ३७० कलम हटवले. जम्मू कश्मीरला विशेष दर्जा देणारे हे कलम होते. पण तेथील जनतेला ३७० कलम हटवल्याच्या दुखापेक्षा राज्य केंद्रशासित झाल्याचे अधिक वाईट वाटले असे मलिक यांनी या मुलाखतीत म्हटले आहे. तसेच एवढे मोठे पाऊल उचलताना माझा सल्लाही घेण्यात आला नाही. मला याबदद्ल काहीही माहित नव्हतं असेही त्यांनी सांगितले . त्याचबरोबर ३७० कलम काढल्यास पोलिसही बंड करतील अशी भीती मोदी सरकारला होती. कारण साधारण पोलीस राज्य सरकार किंवा राज्यपालांच्या नियंत्रणाखाली असतात. यामुळेच पोलिसांच्या बंडाच्या भीतीपोटीच कश्मीरला केंद्रशासित प्रदेश घोषित करण्यात आल्यादा दावा मलिक यांनी केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -