घरदेश-विदेशमहामहिम द्रौपदी मुर्मू पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपतीपदी विराजमान

महामहिम द्रौपदी मुर्मू पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपतीपदी विराजमान

Subscribe

देशाच्या १५व्या राष्ट्रपती म्हणून सूत्रे हाती घेत द्रौपदी मुर्मू सोमवारी राष्ट्रपतीपदावर विराजमान झाल्या. संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये सरन्यायाधीश एन. व्ही. रमण यांनी मुर्मू यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.

देशाच्या १५व्या राष्ट्रपती म्हणून सूत्रे हाती घेत द्रौपदी मुर्मू सोमवारी राष्ट्रपतीपदावर विराजमान झाल्या. संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये सरन्यायाधीश एन. व्ही. रमण यांनी मुर्मू यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. या नेत्रदीपक सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, मंत्री परिषदेचे सदस्य आदी उपस्थित होते. यावेळी पहिले अभिभाषण करताना राष्ट्रपती मुर्मू भावूक झाल्या. भारतात गरीब स्वप्नही पाहू शकतो व पूर्णही करू शकतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी व्यक्त केली. (Her Majesty Draupadi Murmu is the first tribal woman to hold the office of President)

मुर्मू यांनी राजघाटावर महात्मा गांधींना आदरांजली वाहिली. त्यानंतर सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती भवनात पोहचल्या. मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. त्यानंतर सकाळी सव्वादहा वाजेच्या सुमारास देशाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमण यांनी द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपतीपदाची शपथ दिली. शपथविधीनंतर नव्या राष्ट्रपतींचे अभिभाषण झाले. त्यानंतर त्यांना सन्मानाने राष्ट्रपती भवनात नेण्यात आले.

- Advertisement -

लोकशाहीनेच मला येथपर्यंत पोहचवले 

मी देशाची पहिली राष्ट्रपती आहे, जिचा जन्म स्वतंत्र भारतात झाला. स्वतंत्र भारतातील नागरिकांसह आपल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपल्याला आपले प्रयत्न वाढवायचे आहेत. माझा जन्म ओडिसातील आदिवासी गावात झाला, पण देशाच्या लोकशाहीनेच मला येथपर्यंत पोहचवले, अशा भावना यावेळी द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -