घरताज्या घडामोडीFacebook COO : फेसबुकच्या सीओओ शेरिल सॅंडबर्ग यांचा राजीनामा

Facebook COO : फेसबुकच्या सीओओ शेरिल सॅंडबर्ग यांचा राजीनामा

Subscribe

फेसबुकची (Facebook) मुळ कंपनी मेटाच्या सीओओ (META COO) शेरिल सॅंडबर्ग (Sheryl Sandberg) यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. शेरिल गेल्या 14 वर्षांपासून मेटा कंपनीच्या चीफ ऑपरेटिंग ऑफिसर म्हणून कार्यरत होत्या. दरम्यान, शेरिल सॅंडबर्ग यांनी राजीनामा का, दिला याची माहिती अद्याप अस्पष्ट आहे

फेसबुकची (Facebook) मुळ कंपनी मेटाच्या सीओओ (META COO) शेरिल सॅंडबर्ग (Sheryl Sandberg) यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. शेरिल गेल्या 14 वर्षांपासून मेटा कंपनीच्या चीफ ऑपरेटिंग ऑफिसर म्हणून कार्यरत होत्या. दरम्यान, शेरिल सॅंडबर्ग यांनी राजीनामा का, दिला याची माहिती अद्याप अस्पष्ट आहे. मात्र त्यांनी सोशल मीडियावर राजीनामा देणार असून पुढचे त्यांचे प्लॅन्स काय असणार याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. शेरिल सॅंडबर्ग यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर (Social Media) चांगलीच व्हायरल होत आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर फेसबुकचे सीईओ (Facebook CEO) मार्क झुकरबर्ग यांनीही एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.

मार्क झुकरबर्गने (Mark Zuckerberg) आपल्या पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, “शेरिल सॅंडबर्ग फेसबुकसोबत कायम राहतील. शेरिल या फेसबुकच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सचा हिस्सा असतील. तसेच शेरिल यांच्यानंतर फेसबुकचा सीओओ कोण असेल याची सर्वांनाच उत्सुकता होती. शेरिल यांच्यानंतर फेसबुकच्या सीओओचा पदभार जेवियर ओलिवन यांच्यावर सोपवण्यात आला आहे”, असे मार्क झुकरबर्गने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.

- Advertisement -

शेरिल यांची सोशल मीडियावरील पोस्ट

- Advertisement -

फेसबुकच्या सीओओ शेरिल सँडबर्ग यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये सांगितले की, “फेसबुकच्या सीओओ पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्या आता समाजाच्या हितासाठी काम करणार आहे. शिवाय, सोशल मीडियाबाबात त्यांनी सांगत, सोशल मीडियामध्ये आता पूर्वीच्या तुलनेत खूप बदल झाले आहेत.”, असे त्यांनी सांगितले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sheryl Sandberg (@sherylsandberg)

“आपण कोणतेही उत्पादन बनवतो, त्यांचा लोकांवर मोठा प्रभाव पडतो. त्यामुळे लोकांच्या गोपनीयतेचं रक्षण करणं ही आपली जबाबदारी असते. 2008 मध्ये जेव्हा मी कंपनीत रुजू झाले होते, त्यावेळी मला वाटलं होतं की, पुढची पाच एक वर्ष इथे राहीन, पण बघता बघता तब्बल 14 वर्ष उलटून गेली. आता आयुष्याचा नवा अध्याय लिहिण्याची वेळ आली आहे.”, असेही त्यांनी या पोस्टमध्ये लिहिले आहे


हेही वाचा – धोका वाढला! महाराष्ट्रात 1081 नवे कोरोना रुग्ण; मुंबईत चार महिन्यांचा रेकॉर्ड मोडला, आरोग्य यंत्रणा सतर्क

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -