घरताज्या घडामोडीUP Elections 2022 : व्हर्च्युअल रॅलीसाठी झाली मोठी गर्दी, २५०० सपा कार्यकर्त्यांवर...

UP Elections 2022 : व्हर्च्युअल रॅलीसाठी झाली मोठी गर्दी, २५०० सपा कार्यकर्त्यांवर FIR दाखल

Subscribe

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे रॅलीवर निर्बंध लादण्यात आले आहेत. परंतु ही बंदी १५ जानेवारीपर्यंत असणार आहे. मात्र, समाजवादी पार्टी कार्यालयाच्या बाहेर हजारो लोकांच्या जमावाने गर्दी केली होती. व्हर्च्युअल रॅलीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचे तिनतेरा वाजले होते. तसेच कोरोना नियमांचं पालन देखील केलं नव्हतं. त्यामुळे सपाच्या २५०० कार्यकर्त्यांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

CRPC कलम १४४ नुसार सपाविरोधात अॅक्शन घेण्यात आली आहे. पोलीस आयुक्त डीके ठाकुर यांनी सांगितलं की, २५०० समाजवादी पार्टीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये २६९, २७० आणि कलम १४४ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांद्वारे पहिल्यांदा व्हिडिओग्राफी करण्यात आली. त्यानंतर त्यांना सुचना देण्यात आल्या आणि गुन्हा दाखल करण्यात आला.

- Advertisement -

निवडणूक आयोगाच्या नियमांची पायमल्ली

समाजवाजी पार्टीकडून कोणत्याही प्रकारचं वक्तव्य अद्यापही करण्यात आलेलं नाहीये. परंतु भाजपाने या मुद्द्यावर खडाजंगी केलीय. भाजपा प्रवक्ते गौरव भाटिया यांनी सांगितलं की, समाजवादी पार्टीने कोरोनाच्या काळात निवडणूक आयोगाच्या नियमांची पायमल्ली केली आहे. तसेच सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवण्यात आला आहे.

लखनौ जिल्ह्यधिकारी अभिषेक प्रकाशने या प्रकरणावर म्हटलंय की, सपाद्वारे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं नव्हतं. परंतु जेव्हा या कार्यक्रमाची माहिती मिळाली. तेव्हा पोलिसांना सपाच्या कार्यालयात पाठवण्यात आलं. त्यानंतर पोलिसांनी पुढील कारवाईला सुरूवात देखील केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा : कोळीवाडे आणि गावठाणातील घरांचा मालमत्ता कर माफ करा, आशिष शेलारांची मागणी


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -