घरदेश-विदेशअभिनेत्रीच्या पार्लरबाहेर फिल्मी स्टाईल गोळीबार

अभिनेत्रीच्या पार्लरबाहेर फिल्मी स्टाईल गोळीबार

Subscribe

लिनाचे कोचीमधील पानामपिल्ली नगर येथे 'नेल आर्टिस्ट्री' नावाचे पार्लर आहे. ही घटना शनिवारी दुपारी २.३० वाजता घडली. पार्लरच्या बाहेर अज्ञातांनी हवेत गोळीबार केला आणि त्याने एक चिठ्ठी मागे ठेवली. त्यात रवी पुजारी यांचे नाव होते

कोचीमध्ये अभिनेत्री लिना मारिया पॉल हिच्या पार्लरबाहेर अज्ञातांनी गोळीबार केला. गोळीबार केल्यानंतर एक चिठ्ठी मागे ठेवली. त्या चिठ्ठीत अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारी याचे नाव लिहिलेले होते. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार ही चिठ्ठी हल्लेखोर टाकून गेले. पण पोलिसांनी केलेल्या तपासात त्यांना काहीच आढळले नाही. उलट जे समोर आले त्यामुळे एका जुन्या केसला वेगळे वळण मिळाले. त्यामुळे आता अभिनेत्री लिनाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

वाचा- भायखळ्यात गोळीबाराचा थरार; पोलिसांवरच झाडल्या गोळ्या

मारियानेच रचला का बनाव?

लिनाचे कोचीमधील पानामपिल्ली नगर येथे ‘नेल आर्टिस्ट्री’ नावाचे पार्लर आहे. ही घटना शनिवारी दुपारी २.३० वाजता घडली. पार्लरच्या बाहेर अज्ञातांनी हवेत गोळीबार केला आणि त्याने एक चिठ्ठी मागे ठेवली. त्यात रवी पुजारी यांचे नाव होते. पार्लरमधील एका कर्मचाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार दोन मास्कधारी आले आणि त्यांनी हवेत गोळीबार केला. त्यावेळी लिना पार्लरमध्ये नव्हती. तिच्या कर्मचाऱ्याने लागलीच पोलिसांना घटनेची माहिती दिली. घटनास्थळाचा तपास करत असताना पोलिसांना केवळ चिठ्ठी मिळाली. त्या व्यतिरिक्त गोळीबाराचे पुरावे मिळाले नाहीत.

- Advertisement -
वाचा- मुंबई – बंगळुरु महामार्गावर तरूणावर गोळीबार

या आधी आली होती धमकी

ज्यावेळी हा सगळा प्रकार घडला त्यावेळी अभिनेत्री तिथे नव्हती. तिला पोलिसांनी चौकशीसाठी बोलावल्यानंतर या आधीही हल्ल्याच्या धमकी संदर्भात फोन आल्याचे तिने सांगितले. पण या संदर्भात तिने कोणतीही तक्रार केली नाही. तर अशा धमक्यानंतर तिने खासगी सुरक्षारक्षकांची नेमणूक केली. अशी माहिती पोलिसांना तिच्या पार्लरशेजारी असलेल्या एका दुकानदाराने दिली.

या आधी लिनावर फसवणुकीचा गुन्हा

लिनावर २०१३ साली फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. २०१३ साली तिच्यासोबत आणखी ५ जणांना या संदर्भात अटक करण्यात आली होती. त्यामुळे त्या फसवणुकीचा आताच्या गोळीबाराशी काही संबंध आहे का? याचा तपास पोलीस करत आहेत. शिवाय रवी पुजारीचे नाव त्या प्रकरणातून बाहेर पडण्यासाठी केले जात नाही ना? याचा तपास देखील केला जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -