घरताज्या घडामोडीRussia-Ukraine crisis : युक्रेनमधील २१९ भारतीय विद्यार्थी मुंबईत दाखल, पियूष गोयल यांनी...

Russia-Ukraine crisis : युक्रेनमधील २१९ भारतीय विद्यार्थी मुंबईत दाखल, पियूष गोयल यांनी केलं स्वागत

Subscribe

युक्रेनमधल्या २१९ भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन एअर इंडियाचं विमान मुंबईत दाखल झालं आहे. केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी मुंबई विमानतळावर विद्यार्थ्यांचं स्वागत केलं आहे. तसेच पियूष गोयल यांच्यानंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी देखील विद्यार्थ्यांचं स्वागत केलं आहे.

- Advertisement -

जेव्हापासून या युद्धाला सुरूवात झाली. तेव्हापासून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी खूप चिंतेत होते. यावेळी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर हे वेळोवेळी आमच्यासोबत संपर्क करायचे. तसेच रशिया, युक्रेनसह आजूबाजूच्या सर्व देशांसह ते सतत संवाद साधत होते. त्यामुळे युक्रेनमध्ये अडकलेले २१९ विद्यार्थी सुखरूपपणे मुंबईत दाखल झाले आहेत. पीएम मोदींनी मला विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी येथे पाठवलं आहे, असं केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना म्हटले आहे.

- Advertisement -

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुखरुप मायदेशी आणण्यासाठी एअर इंडियाचे विमान युक्रेनमध्ये दाखल झाले होते. परंतु एअर इंडियाचे AIC1944 हे पहिले विमान २१९ भारतीयांना घेऊन बुखापरेस्ट (Bucharest) इथल्या हेन्री कोआंडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन निघाले आणि आता हे विमान मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले आहे.

युक्रेनमधून, मुंबईत सुखरूप परत आलेल्या या सर्व भारतीय बांधवांच्या चेहऱ्यावर हे हसू बघून खूप आनंद होत आहे,” अशी भावना पीयूष गोयल यांनी यावेळी व्यक्त केली. तिथून परत आलेल्या सर्वांनी युक्रेनमधील आपल्या मित्रांशी संवाद कायम ठेवावा, असा सल्ला गोयल यांनी या प्रवाशांना दिला, तसेच, त्यांना काहीही काळजी न करण्याचे आवाहनही केले. सर्व नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकार मिशन मोडवर काम करत आहे, असेही त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षाशी चर्चा झाली आहे आणि त्या चर्चेत, तिथे असलेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेच्या मुद्द्यावर त्यांनी भर दिला, असेही गोयल म्हणाले. सर्व भारतीयांची सुखरूप सुटका करण्यात मदत करण्याचे आश्वासन रशियानेही दिले आहे, असेही गोयल यांनी सांगितले.

गोयल म्हणाले विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी आणखीही विमाने पाठवली जाणार आहेत, आणि दुसरे विमान रविवारी पहाटे दिल्लीत पोहोचण्याची शक्यता आहे. गोयल यांनी देशाविषयी दाखवलेल्या समर्पणासाठी एअर इंडियाचे मनापासून आभार मानले. घरी परत येणाऱ्या प्रवाशांनी एअर इंडियाचे आभार मानले आहेत.

महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडून विद्यार्थ्यांचं स्वागत 

युक्रेन मधून मुंबईत परतलेल्या २१९ विद्यार्थ्यांचे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. याप्रसंगी उपमहापौर ॲड. सुहास वाडकर हेदेखील उपस्थित होते. हे सर्व विद्यार्थी युक्रेन मधील बुकोविनियन राज्य वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. या सर्व विद्यार्थ्यांसाठी खाद्यपदार्थ, पाणी, निवास इत्यादी व्यवस्था महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आली आहे.


हेही वाचा : Russia Ukraine War : युक्रेनमध्ये अडकलेल्या 219 भारतीयांना घेऊन एअर इंडियाचे पहिले विमान भारताकडे रवाना


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -