घरदेश-विदेशOperation Kaveri : सुदानमध्ये अडकलेल महाराष्ट्रातील पाच नागरिक मायभूमीत दाखल

Operation Kaveri : सुदानमध्ये अडकलेल महाराष्ट्रातील पाच नागरिक मायभूमीत दाखल

Subscribe

नवी दिल्ली : सुदानमध्ये आंतरिक संघर्षामुळे (violence-hit Sudan) अशांततेचे वातावरण असून तेथे अडकलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी भारत सरकारने ‘ऑपरेशन कावेरी’ (Operation Kaveri) सुरू केले आहे. या मोहिमेंतर्गत बुधवारी रात्री एका विशेष विमानाने एकूण 360 भारतीय नागरिक दिल्लीत सुखरूप दाखल झाले असून यात महाराष्ट्रातील पाच नागरिकांचा समावेश आहे. या पाचपैकी तीन नागरिकांना महाराष्ट्र सदन सहकार्य कक्षाच्या माध्यमातून स्वगृही पाठविण्यात आले आहे.

गेल्या दहा दिवसांपासून सुदानमध्ये लष्कर आणि निमलष्करी दलात संघर्ष सुरू आहे. या देशातील अनेक ठिकाणी बॉम्बहल्ले करण्यात आले आहेत. सुदानमधील संघर्षात आतापर्यंत 400 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. या संघर्षामुळे सुदानमधील अनेक भागात वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. यानंतर भारतीय नागरिकांना मायदेशी पत आणण्यासाठी मोदी सरकारने सुदान सरकारशी संपर्क करून ऑपरेशन कावेरी सुरू केले आहे. यासाठी भारत सरकारने सुदानशी संपर्क केल्यानंतर त्यांनी तीन दिवस युद्धबंदी घोषित केली आहे.

- Advertisement -

पहिल्या फेरीत 278 भारतीयांना सुखरूप भारतात आणण्यात आले असून दुसऱ्या तुकडीत 246 नागरिक भारतात परतले आहेत. ऑपरेशन कावेरीअंतर्गत विशेष विमान एसवी-3620 जेद्दाह (सौदी अरब) येथून बुधवारी रात्री इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर दिल्ली येथे दाखल झाले. यामध्ये महाराष्ट्रातील पाच नागरिकांचा समावेश होता.

महाराष्ट्र सदन सहकार्य कक्ष
परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने दिल्लीस्थित विविध राज्यांच्या निवासी आयुक्त कार्यालयांना मदत कक्ष स्थापन करण्याच्या सूचना केल्या आहेत. यानुसार इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर महाराष्ट्रासह अन्य राज्यांचे मदत कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. सुदानमधून दिल्लीत परतणाऱ्या महाराष्ट्रातील नागरिकांना सुखरुप स्वगृही पोहचता यावे, यासाठी महाराष्ट्र सदनाचे प्रभारी निवासी आयुक्त नीवा जैन यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर महाराष्ट्र सदनाचा सहकार्य कक्ष सुरू करण्यात आला आहे. सदनाचे अपर निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार या कक्षाच्या पर्यवेक्षणाची आणि केंद्र शासनासोबत समन्वयाची जबाबदारी पार पाडत आहेत.

- Advertisement -

सुदान येथून दिल्लीत दाखल होणाऱ्या महाराष्ट्रातील नागरिकांना आवश्यकतेनुसार विमानाद्वारे राज्यातील त्यांच्या घरापासून नजीकच्या गंतव्यस्थळी पोहचविण्यासाठी कक्षाद्वारे समन्वय केला जात आहे. विमानतळाहून नागरिकांना महाराष्ट्र सदनापर्यंतची वाहतूक व्यवस्था तसेच निवास, भोजन व्यवस्था या कक्षामार्फत करण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -