मोठी बातमी! हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला यांना चार वर्षांची शिक्षा

Former Haryana CM Om Prakash Chautala sentenced to four years
हरयाणाचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकारश चौटाला यांना चार वर्षांची शिक्षा

हरयाणाचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकारश चौटाला यांना चार वर्षांची शिक्षा झाली आहे. उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती जमवल्याचा गुन्हा सिद्धा झाल्यानंतर त्यांना ही शिक्षा देण्यात आली आहे. पोलीसांनी न्यायालयातून ओम प्रकाश चौटाला यांना ताब्यात घेतले आहे. त्यांना 50 लाखांचा दंडही ठोठावण्यात आला असून चौटाला यांच्या चार संपत्ती जप्त करण्याचे आदेश देण्यात आलेत. यात गुरुग्राम, हेली रोड येथील प्रॉपर्टीचा समावेश आहे.

अशी झाली कारवाई – 

24 मे 1993 ते 31 मे 2006 दरम्यान ओम प्रकाश चौटाला मुख्यमंत्री पदी होते. कमाईहून जास्त असल्या प्रकणी त्यांच्याविरोधात 26 मार्च 2010 ला चार्जशीट जारी करण्यात आले. त्यांच्याकडील 6.09 कोटींच्या संपत्तीचा हिशोबच लागलेला नाही. चौटाला यांच्याजवळ त्यांच्या उत्पन्नापेक्षा 189.11 टक्के संपत्ती जास्त आहे. त्यांच्यावर PMPLA कायद्यांतर्गत ED ने तपास सुरु केला होता. 2019 मध्ये ED ने त्यांच्या 3.68 कोटींच्या संपत्तीवर टाच आणली. चौटाला यांची पंचकुला, सिरसा, नवी दिल्लीतील फ्लॅट, एक जमीन जप्त करण्यात आली आहे.

ओम प्रकाश चौटाला यांचा राजकीय प्रवास –

ओम प्रकाश चौटाला हे सात वेळा आमदार होते. त्यांनी त चार वेळा मुख्यमंत्रीपद भूषवले आहे . 2 डिसेंबर 1989 पासून 22 मे 1990, 12 जुलै 1990 ते 17 जुलै 1990, 22 मार्च 1991 ते 6 एप्रिल 1991 आणि 24 जुलै 1995 पासून 2005 पर्यंत ते मुख्यमंत्री होते. ओम प्रकाश चौटाला यांचे वडील जनता दल सरकारमध्ये उपपंतप्रधान होते. वडिलांनंतर ओम प्रकाश चौटाला पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले होते. त्यानंतर त्यांना पोटनिवडणुकांना सामोरे जावे लागले होते. एकूण तीन वेळा ओम प्रकाश चौटाला पोटनिवडणूक लढले आहेत.