घरताज्या घडामोडीकामावरून कमी केलेल्या ट्विटरच्या 'त्या' कर्मचाऱ्यांची जॅक डोर्सीने मागितली माफी

कामावरून कमी केलेल्या ट्विटरच्या ‘त्या’ कर्मचाऱ्यांची जॅक डोर्सीने मागितली माफी

Subscribe

टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांनी ट्विटरची मालकी आपल्याकडे घेतल्यापासून त्यामध्ये सातत्याने बदल करत असल्याचे पाहायला मिळत आहेत. सध्या एलॉन मस्क यांनी ट्विटरमधील कर्मचाऱ्यांची कपात सुरू करण्यात आली आहे. एलॉन मस्क यांनी कामावरून काढलेल्या कर्मचाऱ्यामध्ये भारतीय कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.

टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांनी ट्विटरची मालकी आपल्याकडे घेतल्यापासून त्यामध्ये सातत्याने बदल करत असल्याचे पाहायला मिळत आहेत. सध्या एलॉन मस्क यांनी ट्विटरमधील कर्मचाऱ्यांची कपात सुरू करण्यात आली आहे. एलॉन मस्क यांनी कामावरून काढलेल्या कर्मचाऱ्यामध्ये भारतीय कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. मात्र कर्मचाऱ्यांना कामावरून काढताना ट्विटरचे संस्थापक जॅक डोर्सी यांनी जाहीर माफी मागितली आहे. (founder jack dorsey apologizes amid expulsion of old employees from twitter)

ट्विटरचे संस्थापक जॅक डोर्सी यांनी शनिवारी इलॉन मस्कच्या कारवाईदरम्यान ट्विटरच्या माध्यमातून माफी मागितली आहे. “ट्विटरवर काम केलेले अगोदरचे आणि आताचे कर्मचारी अत्यंत हुशार आहेत. कितीही कठीण प्रसंग आले तरी ते नेहमीच मार्ग शोधतील. मला माहित आहे बरेच कर्मचारी माझ्यावर नाराज आहेत. मला राग आला आहे. मला मान्य आहे की माझ्यामुळे सर्वांवर ही परिस्थिती ओढावली आहे. मी ही कंपनी खूप लवकर मोठी केली आहे, त्यासाठी मी सर्वाची माफी मागतो”, अशा शब्दांत जॅक डोर्सी यांनी माफी मागितली.

- Advertisement -

दरम्यान, शुक्रवारी ट्विटरने आपल्या 7,500 कर्मचाऱ्यांपैकी निम्म्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले. नवीन मालक इलॉन मस्कने ट्विटरची मालकी आपल्याकडे आल्यानंतर एका आठवड्यानंतर कंपनीमध्ये मोठे बदल केले. तसेच, मस्कने ट्विटर इंकार्पोशेनच्या नवीन व्यवस्थापकांना पायाभूत सुविधांची किंमत कमी करण्यासाठी पावले उचलण्यास सांगितले आहे. शिवाय, ट्विटरचा खर्च वर्षाला 1 डॉसर बिलियनने कमी करायचा आहे. त्यामुळे खर्चात कपात करण्यासाठी मस्कने या योजनेला ‘डीप कट्स प्लॅन’ असे नाव दिले असल्याचेही या व्यवस्थापकांनी सांगितले.

ट्विटरच्या ब्लू टिक सब्सक्रिप्शनला सुरुवात झाली आहे. यामुळे ट्विटर यूर्जसना अकाऊंटवर ब्लू टिक हवी असेल तर त्यांना महिन्याला 8 डॉलर म्हणजे 655 रुपये मोजावे लागणार आहेत. कंपनीने केवळ ISO वर आधारित व्हेरिफाइड युजर्सची हा सब्सक्रिप्शन प्लॅन लॉन्च केला आहे. एलॉन मस्क यांनी हा प्लॅन अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि ब्रिटनमधील काही लोकांसाठी सुरु केला आहे. मस्क यांनी ट्विटरच्या या प्लॅनची किंमत प्रति महिना 8 डॉलर ठेवली आहे. मात्र वेगवेगळ्या देशांनुसार या प्लॅनच्या किंमतीत बदल होऊ शकतो.

- Advertisement -

हेही वाचा – अमेरिकेसह ‘या’ 5 देशांमध्ये ट्विटरचे ब्लू टिक सब्सक्रिप्शन सुरू; भारतीयांसाठी मात्र फ्री

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -