Wednesday, April 14, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश फ्रान्समध्ये कोरोनामुळे टेन्शन वाढले ! तिसऱ्यांदा लॉकडाऊनची घोषणा

फ्रान्समध्ये कोरोनामुळे टेन्शन वाढले ! तिसऱ्यांदा लॉकडाऊनची घोषणा

Related Story

- Advertisement -

जगभरात कोरोनास्थिती गंभीर होत असतानाच फ्रान्समध्येही कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळतोय. फ्रान्समध्ये कोरोनाची तिसरी लाट आल्याने अनेक नागरिक पुन्हा अडचणीत सापडले आहेत. परंतु वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी देशात तिसऱ्यांदा लॉकडाऊनची घोषणा केली आहे. फ्रान्समध्ये कोरोना बाधितांची आकडेवारी महाराष्ट्रातील रुग्णसंख्येच्या जवळपास आहे. सध्या फ्रान्समध्ये एकूण कोरोनाबाधितांचा आकडा हा ४६ लाखांवर पोहचला आहे. त्यामुळे फ्रान्समधील शाळा, महाविद्यालये कमीत कमी तीन आठवड्यांसाठी बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

लॉकडाऊनबाबत बोलता फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल म्हणाले की, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आता जर निर्बंध कडक केले नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाईल. त्यामुळे लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करा. या लॉकडाऊनदरम्यान केवळ अत्यावश्यक वस्तूंचीच दुकाने सुरु ठेवण्याची परवानगी आहे. तसेच कार्यालयात जाण्याऐवजी कर्मचाऱ्यांनी वर्क फ्रॉम होम करावे. याचबरोबर पुढील तीन आठवड्यांसाठी शाळा पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्या आहेत. या चार आठवड्यांमध्ये शहरांत कोणत्याही प्रकारच्या सभा, रॅलीवर बंद घालण्यात आली आहे. नागरिकांनीही आवश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नये. परंतु नागरिकांनी घाबरण्याची गरज नाही, फक्त कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करा. आपण सध्या परिस्थिती आटोक्यात आणू शकतो, असे इमॅन्युएल म्हणाले.

- Advertisement -

फ्रान्समध्ये कोरोनाबाधित रुग्णांची एकूण आकडेवारी ४६.४६ लाखांवर पोहचली आहे. तर मृतांचा आकडा ९५ हजार ५०२ झाला आहे. त्यामुळे ब्रिटनहून आलेल्या नव्या स्ट्रेनमुळे फ्रान्समधील कोरोना स्थिती अत्यंत बिकट होत आहे. फ्रान्समध्ये गेल्या २४ तासात २९ हजार ५७५ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे.


- Advertisement -

 

- Advertisement -