घरदेश-विदेशफ्रान्सने अझहरवर बंदी घालण्यासाठी घेतला पुढाकार

फ्रान्सने अझहरवर बंदी घालण्यासाठी घेतला पुढाकार

Subscribe

फ्रान्स संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेकडे (युएनएससी) दहशतवादी मसूद अझहर यांच्यावर बंदी घलण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच अझहर विरोधात पुरावे गोळाकरण्यासाठी भारतही फ्रान्सला मदत करणार असल्याचे समोर आले आहे.

जम्मू काश्मीर येथील पुलवामा जिल्ह्यात १४ फेब्रुवारीला झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये सीआरपीएफचे ४० हून अधिक जवान शहिद झाले आहेत. या भ्याड हल्ल्यानंतर अनेक देशांनी भारताला मदतीचा हात पुढे केला आहे. या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मद या संघटनेनी घेतली होती. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मौलाना मसूद अझहर या दहशदवाद्याच्या विरोधात फ्रान्स सरकारनी पुढाकार घेतला आहे. फ्रान्स संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेकडे (युएनएससी) अझहर आणि त्याच्या कुटुंबियही दहशतवादी कारवाईंमध्ये सहभागी असल्याचे पुरावे सादर करण्याची शक्यता आहे. तसेच अहजरवर बंदी आणण्याचा ही प्रयत्न युएनएससी करणार आहे.

चीनकडून सातत्याने विरोध

फ्रान्सने अझहर आणि त्याच्या कुटुंबियांविरोधात नवीन पुरावे गोळा केले आहेत. ते पुरावे लवकरच फ्रान्स युएनएससीकडे सादर करण्यात आहेत. परंतु अझहर आणि त्याच्या दहशतवादी संघटनेवर बंदी घालण्याच्या प्रस्तावर चीनकडून सातत्याने विरोध दर्शविण्यात आला आहे. पण आता फ्रान्सने पुरावे सादर केल्यानंतर अझहरला आंतरराष्ट्रीय स्तरावर बंदी घालण्याच्या भारताच्या प्रयत्नांना यश मिळण्याची शक्यता वाढली आहे, असे इकनॉमिक टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार समोर आले आहे.

- Advertisement -

रशियांने कायम पाठिंबा दर्शवला

काही दिवसांपूर्वी फ्रान्स युएनएससीच्या माध्यमातून पुलवामा हल्ल्याचा निषेध करण्यात आला होता. या निषेधामध्ये जैशचा समावेश असल्याचे समोर येत आहे. आता भारत ही फ्रान्सला अझहर विरोधात पुरावे गोळा करण्यासाठी मदत करणार आहे. तसेच युएनएससीचे सदस्य रशियानेही कायम अझहर दहशतवादी अल्यावर वेळोवेळी पाठिंबा दर्शवला आहे.

पुलवामाचा १५ देशांकडून निषेध

२०१७ पासून अझहर दहशतवादी गटांवर बंदी आणण्याच्या ठराव मांडण्यात आले होते. परंतु या ठरावाला नेहमीच विरोध केला जात आहे. पुलवामा हल्ल्याचा १५ देशांकडून निषेध व्यक्त केला जात असून यामध्ये चीनचा देखील समावेश आहे. फ्रान्सने घेतलेल्या परिषदेमध्ये जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा उल्लेख करत अशा दहशतवादी संघटनांना शिक्षा झाली पाहिजे असे मत मांडले होते.

- Advertisement -

भारताचा संरक्षणासाठी हल्ला

मंगळवरी केलेल्या वायुसेनेने केलेल्या पाकव्याप्त काश्मीरमधील बालाकोट येथील अझहरचे तळ त्याच्या भावा मार्फत चालवले जात होते. त्या तळांवर मैदाने, स्विमिंग पुल, रेसिंग ट्रॅक, फायरिंग रेंज, सोशल मिडिया वॉर रुम अशा अनेक गोष्टी तयार करण्यात आल्या होत्या. जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने भारतीय जवानंवर हल्ला केला त्यामुळे भारताने संरक्षणासाठी हल्ला केला आहे.


हेही वाचा – हेलिकॉप्टर अपघातात नाशिकचे निनाद मांडवगणे शहीद

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -