घरदेश-विदेशसेक्स करताना आला हृदय विकाराचा झटका आणि...

सेक्स करताना आला हृदय विकाराचा झटका आणि…

Subscribe

बिझनेस ट्रिप दरम्यान एका कर्मचाऱ्याचा सेक्स करताना हृदय विकाराने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी त्या व्यक्तीच्या कुटुंबाला नुकसान भरपाई देण्यात आली आहे.

फ्रान्स येथे एक व्यक्ती २०१३ साली बिझनेस ट्रिपला गेली होती. दरम्यान, या व्यक्तीने बिझनेस ट्रिप वेळी अनोळखी महिलेसोबत सेक्स केला. त्यावेळी सेक्स करत असताना त्यांचे अचानक हृदय बंद पडले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी न्यायालयाने ‘वर्कप्लेस एक्सिडेंट’ म्हणून त्याच्या कुटुंबियांना मदत देण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याप्रकरणी एका फ्रेंच कंपनीला जबाबदार ठरवण्यात आल्याची आश्चर्यकारक बातमी समोर आली आहे.

नेमके काय घडले?

जेवियर असे या व्यक्तीचे नाव असून ही व्यक्ती फ्रान्समधील रेल्वे कंन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये (टीएसओ) इंजिनिअर होती. २०१३ मध्ये कंपनीने काढलेल्या बिझनेस ट्रिपसोबत जेवियर गेले होते. ट्रिप दरम्यान जेवियर हे अनोळखी महिलेसोबत सेक्स करत असताना त्यांना अचानक कार्डियाक अरेस्टचा अॅटक आला अन् त्यांचा त्यात मृत्यू झाला होता. जेवियर यांच्या कुटुंबियांनी मदतीकरता न्यायालयात धाव घेतली. याप्रकरणी २०१३ वर्षांपासून कोर्टात खटला सुरु होता. पॅरिस येथील कोर्टाने या प्रकरणासंबंधी निर्णय दिला असून कर्मचाऱ्याचा मृत्यू इंडस्ट्रियल अॅक्सिडेन्ट असल्याचे सांगत कर्मचाऱ्याच्या परिवाराला नुकसान भरपाई मिळायला हवी, असेही कोर्टाने म्हटले होते. त्यानुसार त्या व्यक्तीच्या कुटुंबाला नुकसान भरपाई मिळाली आहे.

- Advertisement -

कंपनीने काय सांगितले?

कंपनीने आपल्या बचावात सांगितले होते की, कर्मचारी त्याच्या हॉटेल रुममध्ये अनोळखी व्यक्तीसोबत असताना ऑफिसचे कोणतेही काम करत नव्हता. मात्र, फ्रेंच कायद्यानुसार, न्यायाधिशांनी निर्णय दिला की, कर्मचाऱ्याचा मृत्यू बिझनेस ट्रिप दरम्यान झाल्याने या मृत्यूला कंपनी जबाबदार आहे.


हेही वाचा – २५ हजारांच्या दंडाला घाबरुन वडिलांनी मुलाला डांबले घरात


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -