घरदेश-विदेशगँगस्टर अतिक अहमदला युपी न्यायालयात करणार हजर; साबरमती तुरुंगातून पोलिसांचा ताफा युपीच्या...

गँगस्टर अतिक अहमदला युपी न्यायालयात करणार हजर; साबरमती तुरुंगातून पोलिसांचा ताफा युपीच्या दिशेने रवाना

Subscribe

नवी दिल्ली : उमेश पाल हत्याकांडातील मुख्य आरोपी गँगस्टर अतिक अहमदला प्रयागराजच्या खासदार-आमदार विशेष न्यायालयात हजर करण्यासाठी युपी एसटीएफ त्याला प्रयागराजला घेऊन जात आहेत. रविवारी संध्याकाळी 6 वा. निघालेल्या या ताफ्याने आज सकाळी 7 वाजेपर्यंत 780 किमी अंतर पार केले आहे.

अतिक अहमदला रविवारी संध्याकाळी अहमदाबादच्या साबरमती तुरुंगातून युपी पोलिसांनी बाहेर काढले असून ते त्याला प्रयागराजच्या खासदार-आमदार विशेष न्यायालयात नेत आहेत. या न्यायालयात उद्या (२८ मार्च) अतिक अहमदला अपहरणाचा गुन्ह्याप्रकरणी हजर करायचे आहे. अहमदाबादहून निघालेल्या अतिक अहमदच्या एसटीएफ ताफ्याला सुमारे 1300 किलोमीटरचे अंतर कापायचे आहे. हा प्रवास 22 ते 24 तासांचा आहे. त्यामुळे पोलिसांनी सावधगिरी बाळगताना अतिकला हिम्मतनगर-शामलाजी मार्गे राजस्थान, मध्यप्रदेशामधून प्रयागराज नेण्यात येणार आहे. ताफ्याच्या सुरक्षेसाठी दोन व्हॅनमध्ये 30 सशस्त्र जवान तैनात करण्यात आले आहेत.

- Advertisement -

‘त्यांना मला मारायचे आहे’ – अतिक
साबरमती तुरुंगात बाहेर काढण्याआधी शेवटच्या क्षणापर्यंत अतिकला हे माहीत नव्हते की त्याला एसटीएफ युपीला घेऊन जाणार आहे. कारागृहात त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली तेव्हा त्याला समजले. साबरमती तुरुंगातून बाहेर पडताना ‘त्यांना मला मारायचे आहे’ असे अतिकने वक्तव्य केले आहे.

मीडियाला चकमा देण्यासाठी पोलिसांनी बदलला मार्ग
अतिकला घेऊन जाणाऱ्या रस्त्यावर प्रसारमाध्यमांना पाहून युपी एसटीएफने आपला ताफा दुसऱ्या रस्त्याने वळवला. एसटीएफने आपला ताफा शाही बाग अंडरपासवरून यू-टर्न घेऊन नरोडा-चिलोडा रस्त्यावरून शामलाजीकडे वळवला. अंडरपासपासून थोड्याच अंतरावर गेल्यावर त्यांनी प्रसारमाध्यमांच्या वाहनांना थांबवले. सध्या अतिकबाबत एसटीएफचा ताफा हिंमतनगरकडे रवाना झाला आहे. गुजरातमार्गे हा ताफा मध्य प्रदेशमार्गे राजस्थान आणि नंतर प्रयागराजला पोहोचेल.

- Advertisement -

कोणत्या प्रकरणात अतिकला प्रयागराजला नेण्यात येत आहे
अतिक अहमदने 2006 मध्ये उमेश पाल यांचे बंदुकीच्या धाकावर अपहरण केल्यामुळे माफिया अतिक आणि त्याचा भाऊ अशरफ यांच्याविरुद्ध 2007 मध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रयागराजच्या विशेष खासदार/आमदार न्यायालय या प्रकरणी उद्या निकाल देणार आहे. त्यामुळे युपी एसटीएफ आरोपी अतिकला न्यायालयात हजर करण्यासाठी प्रयागराजला घेऊन जात आहे.

अतिकवर व्हिडीओ वॉलद्वारे चोवीस तास नजर
अतिकला प्रयागराज कारागृहाच्या उच्च सुरक्षा बॅरेकमध्ये ठेवण्यात येईल, तसेच त्याच्या कक्षात सीसीटीव्ही कॅमेरा असेल, असे डीजी (तुरुंग) आनंद कुमार यांनी सांगितले. याशिवाय अतिकवर नजर ठेवण्यासाठी कारागृहातील कर्मचाऱ्यांची निवड त्यांच्या रेकॉर्डच्या आधारे केली जाणार आहे. त्यांच्याकडे बॉडी वर्न कॅमेरे असतील. कारागृह मुख्यालय त्याच्यावर व्हिडीओ वॉलद्वारे चोवीस तास नजर ठेवणार, असेही आनंद कुमार यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -