बाबो! पाकिस्तानात तुपाची किंमत ६०० अब्ज रुपये प्रतिकिलो, इम्रान खान यांचा दावा

Ghee Price in Pakistan | पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ते पाकिस्तानमधील तुपाची किंमत सांगत आहे.

imran khan and ghee price

Ghee Price in Pakistan | पाकिस्तानात (Pakistan) महागाईने उच्चांक गाठला आहे. मुलभूत गरजांसाठी तेथील नागरिकांची धावपळ होत आहे. चपातीच्या पिठासाठीही पाकिस्तान महाग झाला आहे. असं असतानाच पाकिस्तानात तुपाची किंमत चक्क ६०० अब्ज प्रति किलो झाली आहे. आता तुम्ही म्हणाल ६०० अब्ज प्रति किलो तूप कसं शक्य आहे. तर हे आम्ही नाही तर पाकिस्तानचे माजी पंतप्रधानच सांगत आहेत. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून त्यात ते चक्क करणारी तुपाची किंमत सांगत आहेत. त्यामुळे नेटकऱ्यांनीही माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या या वक्तव्याची खिल्ली उडवली आहे.

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ते पाकिस्तानमधील तुपाची किंमत सांगत आहे. व्हिडिओमध्ये इम्रान खान सांगत असलेल्या तुपाची किंमत ऐकून तुमचेही डोके चक्रावून जाईल. इम्रान खानचा व्हायरल झालेला व्हिडिओ सुमारे 8 सेकंदांचा आहे. पाकिस्तानी पत्रकार नाइला इनायतने हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. व्हिडिओची क्लिप दुसर्‍या व्हिडिओमधून कट करण्यात आली आहे.

या व्हिडिओमध्ये इम्रान खान त्यांच्या सरकारच्या कार्यकाळातील तुपाच्या किमती आणि सध्याच्या सरकारची तुलना करत आहेत. इम्रान खान म्हणतात, “जे तूप 380 अब्ज होते ते आज 600 अब्ज रुपये किलोपर्यंत पोहोचले आहे.”

किलोमागे ६०० अब्ज पाकिस्तानी रुपये तुपाची किंमत सांगितल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांची खिल्ली उडवली आहे. त्यामुळे प्रतिकिलो तुपाची किंमत सांगायची होती की बॅरलमागे किंमत सांगायची होती याबाबत आता त्यांनाच खुलासा द्यावा लागणार आहे.

पाकिस्तानची आर्थिक स्थिती बिकट आहे. आज पाकिस्तानची आर्थिक स्थिती संपूर्ण जगाला माहित आहे. तूप सोडा… पाकिस्तानी लोक मोठ्या कष्टाने दोन वेळची भाकरी मिळवू शकत आहेत. महागाईने होरपळलेल्या पाकिस्तानी जनतेला गुरुवारी सकाळी आणखी एक झटका बसला आहे. पाकिस्तानमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. पाकिस्तानमध्ये आजपासून पेट्रोलचे दर 22.20 रुपयांनी वाढले आहेत. एक लिटर पेट्रोलचा दर आता 272 रुपयांवर पोहोचला आहे. यासोबतच डिझेलच्या दरातही 17.20 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. एक लिटर डिझेलचा दर 280 रुपयांवर पोहोचला आहे.