घरदेश-विदेशWebsites Down: जगभरात इंटरनेट सेवा ठप्प; माध्यमसंस्था, सोशल मीडियासह सरकारी वेबसाइट्स डाऊन

Websites Down: जगभरात इंटरनेट सेवा ठप्प; माध्यमसंस्था, सोशल मीडियासह सरकारी वेबसाइट्स डाऊन

Subscribe

जगभरात मोठ्या प्रमाणात मंगळवारी इंटरनेट बंद पडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, न्यूयॉर्क टाईम्स (NYT), सीएनएन (CNN) यांच्यासह प्रमुख आंतरराष्ट्रीय बातम्यांच्या वेबसाइट्स आणि पोर्टल इंटरनेट सेवेअभावी ठप्प झाले आहेत. प्राथमिक अहवालात असे म्हटले की एका खासगी सीडीएन (Content Delivery Network) च्या समस्येमुळे इंटरनेटमधील तांत्रिक बिघाड समोर आला आहे. (Internet Outage) याबाबत अधिक माहिती घेतली जात आहे. यामध्ये फायनान्शियल टाईम्स, सीएनएन, द न्यूयॉर्क टाइम्स आणि ब्लूमबर्ग न्यूज सारख्या वेबसाइट्सचा समावेश आहे. या व्यतिरिक्त बर्‍याच सोशल मीडिया साइट्समध्येही लोकांना वापरण्यात अडचणी आल्या. मात्रा काही वेळानंतर आता या वेबसाइट पुन्हा सुरू होण्यास सुरूवात झाली आहे.

- Advertisement -

मीडिया रिपोर्टनुसार सीडीएन (कंटेंट डिलिव्हरी नेटवर्क) मधील तांत्रिक बिघाडामुळे या मोठ्या बातम्या वेबसाइट डाऊन झाल्या आहेत. मात्र याबद्दल आतापर्यंत कोणतीही ठोस माहिती समोर आली नाही. रॉयटर्सने आउटेज मॉनिटरिंग वेबसाइट डाउन डिटेक्टरचा हवाला देत असे सांगितले की, साधारण २१ हजार रेडडिट युजर्सनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरुन समस्या नोंदवल्या. याशिवाय २००० हून अधिक युजर्सनी अ‍ॅमेझॉन वापरण्यात अडचणी आल्याचे सांगितले आहेत.

रेडिट, ट्विट्च, गिटहब, कोरा, अमेझॉन वेब सर्विस, शोपिफाई, ट्विटर, अमेझॉन, Stackoverflow, Vimeo, गुगल, Spotify, गुगल ड्राईव्ह, मेगा, एअरटेल, पेपाल, युट्यूब, स्पीडटेस्ट, फ्रीफायर, इंस्टाग्राम, वोडाफोन, गुगल मीट, जिओ, गुगल मॅप्स, एक्सायटेल, बीएसएनएल, व्हॉट्सअॅप, लाईन, Hulu, जीमेल, नेटफ्लिक्स, अॅक्ट, आयडिया, स्टीम यासारख्या जगभरातील मोठ्या कंपन्या एंटरनेटसेवेअभावी ठप्प होत्या.

- Advertisement -

सीडीएन म्हणजे…

सीडीएन म्हणजेच कंटेंट डिलिव्हरी नेटवर्क्स. याला इंटरनेट पायाभूत सुविधांचा मूलभूत भाग मानला जातो. यासारख्या कंपन्या जागतिक सर्व्हरच्या नेटवर्क्सद्वारे त्यांच्या वेब सेवा जलदगतीने सुधारित करतात. सीडीएन प्रॉक्सी सर्व्हरच्या रूपात काम करते. तुम्ही जेव्हा एखादी वेबसाईट उघडता तेव्हा वेबसाईटवरील माहिती तुम्हाला पाहण्यासाठी ही माहिती एका सीडीएन सर्व्हरवर साठवली जाते. जेणेकरुन वापरकर्त्यांना प्रत्येकवेळी वेब पेज लोड करताना मुख्य सर्व्हरवर जावे लागू नये.


World Brain Tumour Day: आज जगभरात साजरा केला जातो वर्ल्ड ब्रेन ट्यूमर डे, काय आहेत ब्रेन ट्यूमरची लक्षणे?
Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -