घरदेश-विदेशतीन महिन्यांच्या उपचारानंतर पर्रिकर गोव्यात परतले

तीन महिन्यांच्या उपचारानंतर पर्रिकर गोव्यात परतले

Subscribe

स्वादुपिंडाच्या आजारपणावर उपचारसाठी युएसला गेलेले माजी सरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर तीन महिन्यानंतर गोव्यात परतले आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून लकरच ते आपली जवाबदारी स्विकातील असे सांगण्यात येत आहे. आजारी असल्याने मुंबईत उपचार घेत असलेले पर्रिकर हे पुढील उपरांसाठी मार्च महिन्यात युएसला गेले होते.

मनोहर पर्रिकर (६२) यांच्यावर न्यूयॉर्क येथे मागील तीन महिन्यांपासून उपचार सुरु होते. फेब्रुवारी महिन्यापासून पर्रिकरांवर गोवा मेडिकल कॉलेज आणि मुंबईतील लिलावती रुग्णालयात उपचार सुरु होते. तज्ञांकडून त्यांना उपचार मिळावा यासाठी मार्च महिन्यातील पहिल्या आठवड्यात त्यांना युएसला हलवण्यात आले होते.

- Advertisement -

उपचारासाठी न्यूयॉर्कला जात असतानाच राज्याचा कारभार सुरळीत चालावा यावर लक्ष ठेवण्यासाठी त्यांनी समिती नेमली होती. या समितीमध्ये महाराष्ट्र गोमंतक पक्षाचे सुदीन ढवळीकर, भाजपाचे फ्रान्सिस डिसूजा आणि गोवा फॉरवर्ड पार्टीचे विजय सरदेसाई यांच्या नियंत्रणाखाली ही समिती कार्यरत होती. पर्रिकर परत आल्यानंतर उद्या सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक होणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र अद्याप या बाबत कोणतीही अधिकृत घोषणा केले गेली नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -