घरदेश-विदेशGold-Silver Price Today : सोन्याचा दर १८० रूपये तर चांदी १३० रुपयांनी...

Gold-Silver Price Today : सोन्याचा दर १८० रूपये तर चांदी १३० रुपयांनी महागली, जाणून घ्या आजचे दर

Subscribe

मिस कॉल देत जाणून घ्या किंमत

गेल्या आठवड्याभरापासून सोन्या-चांदीच्या दरात घट होत असतानाच दोन दिवसांपासून दर पुन्हा वाढू लागले आहेत. मंगळावारी किंमत वाढल्याने सोन्या-चांदीला पुन्हा झळाली मिळत आहे. बुधवारी सोन्याच्या दरात १८० तर चांदीचा दरात ३०० रुपयांची वाढ झाली आहे. मुंबई आणि पुण्यात आज १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ४७,८९० रुपये इतका झाला आहे. तर २२ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा दर ४६, ८९० रुपये आहे. याचबरोबर चांदीचे दर ६९,४०० इतका झाला आहे. गेल्या आठवड्याभरापासून देशातील सोन्या-चांदीच्या दरात मोठे चढ-उतार होताना दिसत आहेत.

आंतरराष्ट्रीय स्तरावर कमी झालेली सोन्यामधील गुंतवणूक आणि डॉलकच्या वाढत्या किंमतीमुळे सोन्याच्या मागणीवर नकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. यामुळे सोन्याचे दर सतत घसरत आहेत. मात्र येत्या काळात सोन्याचे दर अजून वाढू शकतात. त्यामुळे गुंतवणूकदारांना हीच सुवर्णसंधी असल्याचे मत जाणकार व्यक्त करत आहेत.

- Advertisement -

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स एसोसिएशननुसार, बुधवारी स्थानिक बाजारपेठेत सोन्याचे दर १५७ रुपये तर चांदी ३० रुपयांनी महागली आहे. किंमतीतील फेरबदलामुळे आत ९९९ शुद्ध २४ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याचा दर ४८,१०८ झाला आहे. तर९९९ शुद्ध १ किलो चांदीच्या दरात वाढ होत ६८,९३५ रुपये झाला आहे.

Today Gold Rate : आजचा सोने आणि चांदीचा दर

शुद्धता                     बुधवारी सकाळीचे दर       बुधवारी संध्याकाळी कोट
सोने (प्रति 10 ग्रॅम)             999                          48108
सोने (प्रति 10 ग्रॅम)             995                          47915
सोने (प्रति 10 ग्रॅम)             916                          44067
सोने (प्रति 10 ग्रॅम)             750                          36081
सोने (प्रति 10 ग्रॅम)             585                          28143
चांदी (प्रति 1 किलो)            999                          68935

- Advertisement -

आजचा सोने आणि चांदीचा भाव

मंगळवारी दिल्लीच्या देशांतर्गत बाजारात सोन्या-चांदीच्या किंमती वाढल्या आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, १ जुलैला प्रति दहा ग्रॅम सोन्याची किंमत ४७,९५१ रुपये होती. त्याचबरोबर चांदीचा दर प्रति किलो ६८९०५ रुपये झाली.

मिस कॉल देत जाणून घ्या किंमत

२२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचा किरकोळ दर जाणून घेण्यासाठी आपण 8955664433 वर एक मिस कॉल देऊ शकता. काही वेळातचं तुम्हाला एसएमएसद्वारे दर प्राप्त होतील. या व्यतिरिक्त, सतत दराचे अपडेट मिळवण्यासाठी आपण www.ibja.co वेबसाईटवर जाऊ शकता.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -