घरदेश-विदेशकर्नाटक: दुपारी दोन वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करा - राज्यपाल

कर्नाटक: दुपारी दोन वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करा – राज्यपाल

Subscribe

कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांना राज्यपाल वजुभाई वाला यांनी आज दुपारी दोन वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.

कर्नाटकमध्ये पेटलेलं राजकीय रान अध्यापही विजताना दिसत नाही. मात्र आता या प्रकरणाला कदाचित स्वल्पविराम लागण्याची शक्यता आहे. कारण कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांना आज दुपारी दोन वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. खरंतर विश्वासाच्या ठरावासाठी १८ जुलै ही तारिख निश्चित करण्यात आली होती. मात्र यादिवशी विधानसभेत फक्त गदारोळ झाला. भाजपच्या आमदारांनी विधानसभेच्या अध्यक्षांना वेळ संपली असली तरी निर्णय घ्या, अशी मागणी केली. यासाठी भाजपच्या नेत्यांनी विधानसभेच ठिय्या आंदोलन केले. एवढेच काय तर काही आमदार विधानसभेतच झोपले. त्यामुळे हा मुद्दा जास्त गंभीर होत चालला आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

गेल्या दोन आठवड्याभरापासून कर्नाटकच्या राजकीय वातावरणात प्रचंड वेगाने हालचाली घडल्या. काँग्रेस आणि जेडीएसच्या ११ आमदारांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आणि ते मुंबईत आले. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी भेट न व्हावी, असा त्यामागील उद्देश होता. कारण भेट झाली तर ते मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. बंडखोर आमदारांनी यासाठी मुंबई पोलिसांना सुरक्षेच्या नावाखाली पत्र पाठवले. तरीही कर्नाटकातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवकुमार मुंबईत बंडखोर आमदारांची मनधरणी करण्यासाठी आले. परंतु, बंडखोर आमदारांच्या पंचतारांकीत हॉटेलबाहेर पोलीस बंदोबस्त होता. याशिवाय हॉटेलच्या गेटवर शिवकुमार गो बॅकचा नारा दिला गेला. त्यामुळे शिवकुमार यांना न भेटताच परतावे लागले. दरम्यान, विधानसभेचे अध्यक्ष रमेश कुमार यांनी काही आमदारांचे राजीनामे संविधानिक कायद्यानुसार योग्य नसल्याचे म्हणत राजीनामे नाकारले. त्यामुळे बंडखोर आमदारांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. सुप्रीम कोर्टाने आमदारांच्या बाजूने सुनावणी देत विधानसभेच्या अध्यक्षांसोबत बसून राजीनाम्यावनर चर्चा करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर गुरुवारी कुमारस्वामी विधानसभेत बहुमत सिद्ध करणार होते.

- Advertisement -

हेही वाचा – ‘शिवकुमार गो बॅक’; कर्नाटकच्या राजकीय नाट्याला वेगळे वळण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -