घरदेश-विदेशअमेरिकेने पाडले इराणचे ड्रोन

अमेरिकेने पाडले इराणचे ड्रोन

Subscribe

अमेरिका आणि इराण या दोन देशांमधील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. अमेरिकेने हॉर्मूज खाडी क्षेत्रामध्ये इराणचे दोन ड्रोन पाडल्याचा दावा केला आहे. दोन आठवड्यांपूर्वी इराणने अमेरिकेचे दोन ड्रोन पाडले होते. त्याचा बदला आता अमेरिकेने घेतला आहे. अमेरिकेचे ड्रोन पाडल्यामुळे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना राग अनावर झाला होता. त्यांनी ताबडतोब इराणवर हल्ल्याचे आदेश दिले होते. मात्र, लगेच हे आदेश मागे घेण्यात आले. त्यानंतर आता अमेरिकेने इराणचे दोन ड्रोन पाडून बदला घेतला आहे. यासंदर्भात डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वत: माहिती दिली आहे.

नेमकं काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?

हॉर्मूज खाडीमध्ये प्रवेश करणाऱ्या अमेरिकेच्या युद्धनौकेला धोका निर्माण झाला होता. त्यामुळे इराणचे दोन ड्रोन अमेरिकेच्या नौदालाने पाडले. हे ड्रोन पाडल्यानंतर खाडी क्षेत्रात तणावग्रस्त परस्थिती निर्माण झाली होती, असे स्वत: डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहेत. तर अमेरिकेने ड्रोन पाडल्याच्या दाव्याचे इराणने खंडन केले आहे. इराणचे वरिष्ठ अधिकारी मोहम्मद जरीफ यांनी ड्रोन पाडल्याची कोणतीही माहिती आलेली नाही, असे सांगितले आहे.

- Advertisement -


हेही वाचा – इराण-अमेरिकेतील तणावाचा भारताला मोठा फटका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -