दिशाभूल करणाऱ्या जाहिरातांना बसणार चाप; केंद्र सरकारने जारी केल्या गाईडलाईन्स

Govt issues new guidelines to prevent misleading advertisements

दिशाभूल करणाऱ्या जाहीरातींना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने नव्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. यामुळे ग्राहकांना फसवण्यासाठी जाहीराती चालवणे पुढे सोपे असणार आहे. या दिशाभूल करणाऱ्या जाहीरातींमध्ये मुलांना लक्ष्य करणाऱ्या जाहीराती आणि ग्राहकांना भुरळ घालण्यासाची मोफत दावे करण्याऱ्या जाहिरातींचा समावेश आहे.

सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचा उद्देश ग्राहकांच्या हिताचे रक्षण करणे, अनफेअर ट्रेड पद्धतींना आळा घालणे आणि दिशाभूल करणाऱ्या दाव्यांवर कारवाई करणे हा आहे. सरकारकडून असेही सांगण्यात आले की, कोरोना महामारीच्या काळात सर्व दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे जाहिराती प्रसिद्ध करण्यापूर्वी योग्य ती काळजी घेतली पाहिजे अशी माहिती ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये म्हटले आहे. तसेच ‘सरोगेट’ जाहिरातींवरही बंदी घातली असल्याचे नमुद केले आहे.

दिशाभूल करणाऱ्या जाहिराती म्हणजे काय?

उत्पादन किंवा सेवेबद्दल चुकीची माहिती देणारी जाहिरात दिशाभूल करण्याच्या अधीन आहे. कंपनीच्या वतीने कोणताही केलाला दावा जर उत्पादनाशी जुळत नसल्यास ती दिशाभूल करणारी जाहिरात म्हटली जाईल. याशिवाय उत्पादनाबाबत आवश्यक माहिती लपवली जात असेल, तर तीही दिशाभूल करण्याच्या कक्षेत येईल.

मुलांसाठी कोणत्याही प्रकारचा अवास्तव दावा करणाऱ्या जाहिरातींवर बंदी घालण्यात येईल, असेही मार्गदर्शक तत्त्वात सांगण्यात आले होते. असे आढळल्यास एंडोर्समेंट आणि एंडोर्सर दोघांवरही कठोर कारवाई केली जाईल. त्यामुळे कोणत्याही जाहिरातीत ‘लवकर खरेदी करण्यास’ सांगता येणार नाही, असेही सांगण्यात आले आहे.

जर कंपनी जाहिरातीत स्पेशल ऑफर किंवा अर्धी किंमत किंवा फ्रीबीज सारखे दावे करत असेल तर त्यासाठी पुरेसा स्टॉक ठेवावा लागेल. अनेकवेळा असे दिसून आले आहे की, अशा ऑफर दिल्यानंतर कंपनी सांगते की, स्टॉक संपला आहे. याशिवाय मोफतच्या दाव्यासोबत अटी लागू असल्याचं म्हटलं तर तीही दिशाभूल करणारी जाहिरात मानली जाईल. टूथपेस्ट आणि चवनप्राश सारख्या उत्पादनांसाठी कोणताही व्यावसायिक वापरला जाऊ शकत नाही. जर कंपनीचा कोणता सदस्य जाहिरात करत असेल, तर त्याला/तिला कंपनीतील त्याचे स्थान देखील नमूद करावे लागेल.

टूथपेस्ट आणि च्यवनप्राश सारख्या उत्पादनांसाठी कोणताही व्यावसायिक वापरला जाऊ शकत नाही. जर कंपनीचा कोणताही सदस्य जाहिरात करत असेल, तर त्याला/तिला कंपनीतील त्याचे स्थान देखील नमूद करावे लागेल.

सीसीपीएने सांगितले की, दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींबाबत आतापर्यंत एकूण 113 नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. यापैकी 57 Misleading add, 47 Unfair Trade Practice 47 आणि 9 ग्राहक हक्कांमध्ये अडथळा आणल्याबद्दल होते.


ईडीचा डाव फसला आता रडीचा डाव सुरू, संजय राऊतांचा भाजपवर निशाणा