ईडीचा डाव फसला आता रडीचा डाव सुरू, संजय राऊतांचा भाजपवर निशाणा

shivsena mla sanjay raut on eknath shinde shivsena mla security maharashtra politics

राज्यसभेच्या सहा जागेंसाठी आज मतदान पार पडलं आहे. मात्र, अद्यापही मतमोजणीला सुरूवात झालेली नाहीये. अशीच परिस्थिती देशातील इतर राज्यांमध्ये सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. या संदर्भातील माहिती काँग्रेसचे नेते अजय माकन यांनी दिली आहे. त्यानंतर त्यांचे ट्विट शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत महाराष्ट्रातही अशा प्रकारचं घटिया पॉलिटिक्स सुरु असल्याचं म्हटलं आहे. परंतु राज्यातही आता मतमोजणीची प्रक्रिया लांबली असून ईडीचा डाव फसला आता रडीचा डाव सुरू, असं ट्विट संजय राऊत यांनी केलं असून भाजपवर निशाणा साधला आहे.

खासदार संजय राऊतांचं ट्विट –

राज्यसभा निवडणुकीची मतमोजणी का व कोणी थांबवली आहे? ईडी चा डाव फसला! आता रडीचा डाव सुरू झाला!! आम्हीच जिंकू! जय महाराष्ट्र!!, असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे.

राज्यसभा निवडणुकीच्या निकालात नामुष्की ओढवणार असल्याच्या भीतीनं भाजपनं हरियाणात मतमोजणी थांबवून घाणेरडं राजकारण केलं आहे, असं ट्विट अजय माकन यांनी केलं आहे. त्यानंतर संजय राऊतांनी सुद्धा ट्विट करत महाराष्ट्रातही हाच खेळ सुरु आहे. सध्या राज्यात घाणेरडं राजकारण सुरू असल्याचं संजय राऊतांनी म्हटलं आहे.

मतमोजणीला विलंब कशामुळे ?

राज्यसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला १-१ मत महत्त्वाचे असताना भाजपकडून आता ३ मतं बाद करण्याची मागणी करण्यात आली आहे. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, काँग्रेस नेत्या आणि महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर आणि शिवसेनेचे नेते सुहास कांदे यांच्या मतदानावर भाजपने आक्षेप घेतला आहे. या आक्षेपामुळे
मविआमध्ये मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण झाली आहे. या तिन्ही नेत्यांची मतं रद्द करण्याची मागणी भाजपकडून करण्यात येत आहेत. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोग यावर कोणत्याही प्रकारचा निर्णय घेत नाहीत, तोपर्यंत मतमोजणी प्रक्रिया सुरू होऊ शकत नाही. तसेच यासंबंधीचे व्हिडिओ देखील केंद्रीय निवडणूक आयोगाने मागवले असून मतमोजणीला विलंब होत आहे.

दोन्ही नेत्यांमध्ये चुरशीची लढाई

राज्यसभेच्या सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये काँग्रेसचे इम्रान प्रतापगडी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल, शिवसेनेचे संजय राऊत, संजय पवार आणि भाजपचे अनिल बोंडे, धनंजय महाडिक हे उमेदवार रिंगणात आहेत. यापैकी संजय पवार आणि धनंजय महाडिक हे सहाव्या क्रमांकाचे उमेदवार आहेत. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये चुरशीची लढाई सुरू आहेत. या लढाईत कोणता नेता बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


हेही वाचा : महाविकास आघाडीत धुसफूस, राष्ट्रवादीच्या आमदाराचा मुख्यमंत्र्यांना इशारा