घरदेश-विदेशHappy Birthday Ratan Tata : आईने नाही तर 'या' स्त्रीने केला रतन...

Happy Birthday Ratan Tata : आईने नाही तर ‘या’ स्त्रीने केला रतन टाटांचा सांभाळ

Subscribe

भारताचे दिग्गज उद्योगपती रतन टाटा यांचा आज 85 वा वाढदिवस आहे. रतना टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी मुंबईमध्ये झाला होता. एक यशस्वी उद्योगपती, मोठ्या मनाचा माणूस अशी त्यांचे व्यक्तिमत्व आहे. त्यांचा स्वभाव खूप शांत आहे परंतु त्यांचे कतृत्व अजरामर आहे.

आजीने केला रतन टाटा यांचा सांभाळ 
आई-वडीलांच्या आपापसातील मतभेदांमुळे त्यांचा सांभाळ त्यांच्या आजीने केला. वयाच्या 10 व्या वर्षापासून त्यांच्या आजीने त्यांना सांभाळले. वयाच्या 25 व्या वर्षापासून रतन टाटा यांच्या कारकिर्दीची सुरुवात झाली. 1959 मध्ये ते आर्किटेक्चर आणि स्ट्रक्चरल इंजीनियरिंगचे शिक्षण घेण्यासाठी कॉर्नेल विश्वविद्यालयात गेले. परदेशातून भारतात परतण्यापूर्वी 1962 मध्ये त्यांनी लॉस एन्जेलिसमध्ये Jones and Emmons साठी काम केले. 1962 मध्ये ते टाटा समूहात सहभागी झाले आणि त्यावेळी त्यांचे काम जमशेदपुरमध्ये टाटा स्टील डिलीडनसोबत काम करण्याचे होते. 1775 मध्ये त्यांनी हार्वर्ड बिजनेस स्कूलकडून मॅनेजमेंटचा कोर्स केला. 1991 साली ते टाटा ग्रुपचे चेअरमन झाले होते.

- Advertisement -

पहली नौकरी टाटा स्टील डिवीजन के साथ

रतन टाटा यांनी भारताला पहिली स्वदेशी कार बनवून दिली. 1998 मध्ये टाटा समुहाकडून इंडिका ही पहिली स्वदेशी कार ऑटो एक्स्पोमध्ये सादर करण्यात आली होती. रतन टाटा यांना बरेच छंद आहेत. त्यातलाच एक छंद आणि आवड म्हणून त्यांनी 2007 मध्ये F-16 फाल्कन (F-16 Falcon) उडवलं होतं. असं करणारे ते पहिले भारतीय ठरले होते.

- Advertisement -

 


हेही वाचा :

CBSE Practical Exam : दहावी आणि बारावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -