घरदेश-विदेशNew Year 2022 : नवीन वर्ष कोणत्या अर्थाने नवे असेल; या २२...

New Year 2022 : नवीन वर्ष कोणत्या अर्थाने नवे असेल; या २२ गोष्टीमुळे नवीन वर्ष आहे खास

Subscribe

Happy New Year 2022 : जगभरात २०२२ या नवीन वर्षाचे मोठ्या उत्साहात स्वागत होत आहे. मागील २०२१ हे वर्ष संपले असले तरी हे वर्ष खूप निराशाजनक गेले असे म्हणता येईल. यावर्षी भारताला कोरोनाच्या दुसऱ्या भयानक लाटेचा सामना करावा लागला ज्यामध्ये हजारो लोकांचा मृत्यू झाला. त्यामुळे २०२१ हे वर्ष काही चांगल्या गोष्टी देऊन जात आहे तर काही काही वाईट आठवणी देऊन जात आहे. हे नवीन वर्ष नव्या आशांनी भरलेले असेल. तसेच कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने वर्षाची सुरुवात होत असली तरी २०२२ या महामारीला मागे टाकू शकेल अशी आशा जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली आहे. कोरोना महामारीपासून राजकारण, खेळापर्यंत, नवीन वर्ष जगाला कोणत्या आशा घेऊन येऊ शकते. चला जाणून घेऊया…

कोरोना महामारी संपेल?

१) नव्या वर्षात मोठी आशा मुलांच्या लसीबद्दल आहे. भारतात १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण ३ जानेवारीपासून सुरू होत आहे. भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन चाचणी २ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांवर प्रभावी ठरली आहे. यावर्षी लहान मुलांचे लसीकरण सुरू होणे अपेक्षित आहे. यावर सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने म्हटले की, कोवोव्हॅक्स लस पुढील ६ महिन्यांत येईल. ही लस ३ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना दिली जाईल.

- Advertisement -

२) याशिवाय नवीन वर्षात कोरोना महामारी संपुष्टात येऊ शकते असेही म्हटले जाते. यावर जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन म्हणतात की, नवीन वर्षात लसीकरण मोहिमेचा वेळ वाढल्यास ही महामारी नियंत्रणात येईल. तसेच सध्या कोरोना संसर्गात लोकांना सर्दीसारखी सामान्य लक्ष दिसून येत आहेत जी हाताळणे आरोग्य यंत्रणेच्या आवाक्यात आहे. तसेच लवकरच देशात नाकावाटे दिली जाणारी लस उपलब्ध होईल.

शेअर मार्केटकडून काय अपेक्षा ठेवायची?

१) शेअर बाजार या वर्षी मोठी झेप घेऊ शकतो. सीएनआय रिसर्चचे किशोर ओस्तवाल यांचे मत आहे की, यंदा निफ्टी २१ हजारांचा विक्रम करू शकतो. वर्ष कदाचित ओमिक्रॉनच्या सावलीत सुरू होत असेल, परंतु हे शॉर्ट टर्म रिस्क फॅक्टर आहे. यात ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालला नवीन वर्षात निफ्टीकडून १२ ते १५ टक्के परतावा अपेक्षित आहे. अर्थव्यवस्था मजबूत होतेय. अनेक फ्रिक्वेंसी इंडिकेटरने कोरोनाची पातळी ओलांडली आहे. सप्टेंबर २०२१ च्या तिमाहीनंतर कंपन्यांची कमाई अपेक्षेपेक्षा चांगली आहे.

- Advertisement -

२) पुढील दोन महिन्यात LIC सह ४५ कंपन्यांचे IPO बाजारात येऊ शकतात. गेल्या 3 महिन्यांत, ४९ हून अधिक कंपन्यांनी सेबीकडे IPO कागदपत्रे सादर केली आहेत. यामध्ये Ola, Byjus, Oyo सारख्या प्रसिद्ध स्टार्टअप्सचा समावेश आहे. LIC चा IPO ८० हजार ते एक लाख कोटी रुपयांचा असू शकतो असा अंदाज आहे.

नोकऱ्यांची काय स्थिती आहे?

१) २०२२ मध्ये RRB NTPC चा निकाल प्रसिद्ध होणार आहे. आरआरबी ग्रुप डीच्या परीक्षाही फेब्रुवारीमध्ये होणार आहेत. राष्ट्रीय आरोग्य अभियान, UP (NHM, UP) ने 2,980 पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. तुम्ही ७ जानेवारीपर्यंत अर्ज करू शकता. केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) ने १३ जानेवारीपर्यंत १८७ पदांसाठी भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) ने UDC, MTS आणि Steno पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण पदे ३८४७ आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ फेब्रुवारी २०२२ आहे.

5G बद्दल काय अपेक्षा आहेत?

१) भारतातील 5G ​​सेवेची प्रतिक्षा 2022 मध्ये संपणार आहे. या सेवेची लाँचिंग १३ शहरांमध्ये केली जाईल. त्यानंतर इतर शहरांमध्ये सुरू करण्यात येईल. दूरसंचार विभागाकडून सांगण्यात आले आहे की, २०२२ मध्ये अहमदाबाद, बेंगळुरू, चंदीगड, चेन्नई, दिल्ली, गांधीनगर, गुरुग्राम, हैदराबाद, जामनगर, कोलकाता, लखनऊ, मुंबई आणि पुणे येथे 5G इंटरनेट सुरू होईल.

अर्थव्यवस्थेकडून काय अपेक्षा आहेत?

१) आरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीचे सदस्य जयंत आर वर्मा यांनी अर्थव्यवस्थेला गती मिळण्याची आशा व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, २०२२-२३ मध्ये चांगली वाढ दिसून येईल. मात्र महागाई कमी होण्याची अपेक्षा नाही. एनक्वायर्सच्या अर्थतज्ज्ञ अनिथा रंगन म्हणाले की, घाऊक महागाई उच्च पातळीवर राहिली आहे, त्यामुळे मार्च-एप्रिलमध्ये किरकोळ महागाई ६ टक्क्यांचा टप्पा ओलांडेल. ही परिस्थिती वर्षभर टिकू शकते. महागाईत वाढ झाल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे.

सोन्याच्या किमतीकडून काय अपेक्षा आहेत?

२) २०२१ मध्ये सोन्याच्या किमतीत ४ टक्क्यांची घसरण झाली असली तरी नवीन वर्ष उत्तम ठरू शकते. असे विश्लेषकांचे मत आहे. सध्या महागाई वाढत आहे. जगातील अनेक देशांमध्ये महागाईचा दर दशकभराच्या उच्च पातळीवर आहे. भारतातील किरकोळ महागाई फार जास्त नाही, परंतु घाऊक महागाई १० वर्षांपेक्षा जास्त उच्च पातळीवर आहे. येत्या काही महिन्यांत किरकोळ महागाई वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही महागाई सोन्याची चमक वाढवणारी ठरणार आहे.

खेळाकडून काय अपेक्षा आहेत?

१) दक्षिण आफ्रिकेत खेळल्या जात असलेल्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना विराट कोहलीसाठी खास असणार आहे, कारण ही त्याची १०० वी कसोटी असेल. तसेच विराट कोहलीच्या शतकांचा दोन वर्षांचा दुष्काळही २०२२ मध्ये संपेल, अशी अपेक्षा आहे. २०२२ मध्ये, भारताला 2-2 ICC स्पर्धांची ट्रॉफी जिंकण्याची संधी आहे. महिला विश्वचषक मार्च-एप्रिलमध्ये सुरू होत आहे. पुरुषांचा T20 विश्वचषक वर्षाच्या शेवटी ऑस्ट्रेलियात होणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया खेळणार हा पहिलाच विश्वचषक असेल. २०२२ च्या शेवटी फुटबॉल विश्वचषक होणार आहे, जो यावेळी कतारमध्ये होणार आहे. चार वर्षांतून एकदा होणाऱ्या विश्वचषकाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत, त्यामुळे फुटबॉल विश्वावर कोण राज्य करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

बॉलिवूड-हॉलिवूडकडून काय अपेक्षा आहेत?

१) यावर्षी राजामौलींचा RRR हा चित्रपट, आलिया भट्टचा गंगूबाई काठियावाडी’, शाहरुखचा चित्रपट पठाण, आमिर खानचा चित्रपट लाल सिंग चड्ढा, रणबीर कपूरचा चित्रपट शमशेर, ब्रह्मास्त्र, अक्षय कुमारचा चित्रपट पृथ्वीराज, राम सेतू प्रदर्शित होऊ शकतो. याच वर्षी दिग्दर्शक जेम्स कॅमेरूनचा अवतार २ हा चित्रपटही याच वर्षी प्रदर्शित होणार आहे. Fantastic Beasts: The Secrets of Dumbledore देखील २०२२ मध्ये रिलीज होणार आहे. हॅरी पॉटरचे चाहते या चित्रपटाबद्दल खूप उत्सुक आहेत.

२) २०२१ प्रमाणे या वर्षीही अनेक स्टार्स लग्न करणार आहेत. रिचा चढ्ढा आणि अली फजल यांनी मार्च २०२२ मध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट देखील २०२२ मध्ये लग्न करू शकतात, हे वर्षातील सर्वात मोठे लग्न आहे. हॉलिवूड सुपरस्टार जेनिफर लोपेझ आणि बेन ऍफ्लेक यांचेही २०२२ मध्ये लग्न होऊ शकते.

राजकारणाकडून काय अपेक्षा आहेत?

१) २०२२ मध्ये ७ राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. ज्या सात राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत, त्यापैकी ६ राज्यांमध्ये भाजपाचे सरकारे आहेत, तर एका राज्यात काँग्रेसची सत्ता आहे. अशा स्थितीत २०२२ मध्ये आपल्या राज्यांची सत्ता कायम ठेवण्याचे आव्हान भाजपसमोर असेल, तर काँग्रेससह विरोधी पक्षांना पुन्हा सत्तेत येण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे.

२) उत्तर प्रदेशची निवडणूक मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे राजकीय भवितव्यही ठरवेल. भाजपचा विजय झाला आणि योगी मुख्यमंत्री झाले तर २०२४ मध्ये ते पंतप्रधानपदाचे दावेदारही होऊ शकतात. मात्र त्यांचा पराभव झाला तर त्यांचे राजकीय भवितव्यही अंधारात जाऊ शकते. ही निवडणूक मायावती आणि अखिलेश यादव यांचे भवितव्यही ठरवणार आहे.

३) उत्तराखंडमध्ये विधानसभेचीही निवडणूक आहे. येथे दर ५ वर्षांनी सत्ता बदलते. त्याचवेळी पंजाबमध्ये भाजपने कॅप्टन अमरिंदर सिंग आणि सुखदेव सिंग धिंडसा यांच्या पक्षाशी हातमिळवणी केली आहे, तर काँग्रेस एकाकी लढत आहे. यावेळी आम आदमी पक्षही रिंगणात आहे. याशिवाय गोवा आणि मणिपूरमध्येही सत्ता टिकवण्याचा भाजपचा प्रयत्न असेल. गुजरात आणि हिमाचलमध्येही वर्षाच्या शेवटी निवडणुका आहेत. दोन्ही ठिकाणी भाजपची सत्ता आहे. २०२२ मध्ये काँग्रेसला नवा आणि पूर्णवेळ अध्यक्ष मिळू शकतो.

ऑटो मार्केटकडून अपेक्षा काय आहेत?

१) नवीन वर्षात कारसोबतच दुचाकींच्या किंमतीही वाढणार आहेत. जगभरात सेमीकंडक्टरच्या कमतरतेमुळे हे घडत आहे. याशिवाय कच्च्या मालाची वाढती किंमत हेही यामागचे एक कारण आहे. मात्र, यामुळे सेकंड हँड वाहनांची बाजारपेठ वाढेल, त्याचा फायदा ग्राहक आणि दुकानदारांना होईल, अशी आशा तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. यासोबतच या वर्षी अनेक इलेक्ट्रिक वाहने भारतीय बाजारपेठेत दाखल होणार आहेत. या लाइनमध्ये टाटा, बीएमडब्ल्यू आणि व्होल्वोसारख्या कंपन्यांचा समावेश आहे. महिंद्रा मार्च २०२२ मध्ये eKUV100 लाँच करू शकते, जिथे BMW सेडान आणेल. ही देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार असू शकते.


आजपासून ATM मधून पैसे काढण्यासाठी द्यावा लागणार एक्स्ट्रा चार्ज


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -