घरताज्या घडामोडीUttarakhand Assembly Elections 2022: हरक सिंह यांना काँग्रेसमधून ग्रीन सिग्नल, पुरोलातून दुर्गेश्वर...

Uttarakhand Assembly Elections 2022: हरक सिंह यांना काँग्रेसमधून ग्रीन सिग्नल, पुरोलातून दुर्गेश्वर लालांना मोठा धक्का

Subscribe

उत्तराखंड विधानसभा निवडणुकींच्या घडामोडींना सुरूवात झाली आहे. यादी जाहीर करण्यापूर्वीच अनेक राजकीय नेत इतर पक्षात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. भाजपातून हकालपट्टी करण्यात आलेल्या हरकसिंह रावत यांना काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा प्रवेश मिळणार आहे. गेल्या तीन दिवसांपासून काँग्रसचे दार ठोठावणाऱ्या यांच्या पुनरागमनामुळे निवडणूक लढविण्याचा मार्गही मोकळा होताना दिसत आहे.

दिवंगत सीडीएस जनरल बिपिन रावत यांचे बंधू निवृत्त कर्नल विजय रावत सामील झाल्यानंतर भाजपला आणखी एक आघाडी मिळणार आहे. काँग्रेस पक्षात प्रवेश करणारे दुर्गेश्वर लाल आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. काँग्रेसकडून हरक सिंह यांना ग्रीन सिग्नल देण्यात आला आहे. तसेच त्यांना तिकीट देण्याबाबत पक्षांतर्गत सकारात्मक निर्णय झाल्याचं सांगितलं जात आहे.

- Advertisement -

हरक सिंह रावत यांनी माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांची काँग्रेसमध्ये परतल्याबद्दल उघडपणे माफी मागितली होती. त्यानंतर हरीश रावत यांनीही त्यांना माफ करण्याचे संकेत दिले होते.

पुरोलातून दुर्गेश्वर लालांना तिकीट

भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या दुर्गेश्वर लाल यांना पुरोलातून तिकीट मिळण्याची शक्यता आहे. २०१७ मध्ये त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. परंतु लाल आता भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत. गेल्या वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यामध्ये म्हणजेच दोन महिन्यांपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. अपक्ष म्हणून लढवलेल्या निवडणुकीत लालांना १३ हजार ८०५ इतकी मतं मिळाली होती.

- Advertisement -

हेही वाचा : Delhi Riot Case : दिल्ली दंगल प्रकरणात पहिली शिक्षा, हिंसाचाराप्रकरणी आरोपीला ५ वर्षाचा तुरूंगवास


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -