घरताज्या घडामोडीशिवसेना विरुद्ध राणे, वादाचा दुसरा अंक सुरू; मुख्यमंत्र्यांविरोधात भाजप करणार तक्रार दाखल

शिवसेना विरुद्ध राणे, वादाचा दुसरा अंक सुरू; मुख्यमंत्र्यांविरोधात भाजप करणार तक्रार दाखल

Subscribe

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे काल, मंगळवारी राज्यातील चार ठिकाणी तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर नारायण राणे यांना दुपारी अटक झाली. पण रात्री महाड न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली. मात्र आता भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले असून यामुळे शिवसेना विरुद्ध नारायण राणे वादाच्या नव्या आणि दुसऱ्या अंकाला सुरुवात झाली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबाबत दसरा मेळाव्यात केलेल्या विधानावरून भाजप कार्यकर्ते आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात तक्रार दाखल करणार आहेत.

काल, मंगळवारी राज्यात शिवसेना विरुद्ध नारायण राणे वादाचा पहिला अंका पाहायला मिळाला. आज या वादाच्या दुसऱ्या अंकाला सुरुवात झाली आहे. यवतमाळ येथे पाच ठिकाणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात भाजप तक्रार दाखल करणार आहे. याबाबतची माहिती यवतमाळ भाजप जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांनी दिली आहे. त्यामुळे आता शिवसेना विरुद्ध राणे वाद विकोपाला जाताना दिसत आहे.

- Advertisement -

भाजप जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा म्हणाले की, ‘दसरा मेळाव्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशातील सर्वात मोठं राज्य असलेल्या उत्तर प्रदेशाच्या मुख्यमंत्र्यांना चप्पलाने मारावं असं वक्तव्य केलं होत. खऱ्या अर्थाने उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य हे दोन समाजात तेढ निर्माण होईल अशा पद्धतीचं आहे. त्यामुळे आता राज्यातील अनेक ठिकाणी भाजप कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार करणार आहेत.’

दसरा मेळाव्यात काय म्हणाले होते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे?

‘शिवरायाला राज्याभिषेक करताना तिथून इथे गागाभट्ट आले होते. उत्तर प्रदेशमधून गागाभट्ट आले होते. त्यांनी किती सन्मानाने शिवरायांना राज्याभिषेक केला होता आणि हा जो योगी आला. अशी टरटरुन, कसलं काय नसलं की, म्हणजे गॅसचा फुगा असतो ना, काही नसतो, गॅस असतो पण हवेत उडत असतो. तसा हा गॅसचा फुगा आला तो सरळ चपला घालून महाराजांना हार घालायला गेला. असं वाटलं त्याचं चपला घ्याव्या आणि त्याचं थोबाडं फोडावं. लायकी तरी आहे का तुझी? महाराजांच्या पुतळ्याच्या समोर राहण्याची,’ असं उद्धव ठाकरे म्हणाले होते.

- Advertisement -

हेही वाचा – घटनेची पुनरावृत्ती होणार नसल्याचं राणेंनी लिहून दिल्यानं अटकेची गरज नाही – नाशिक पोलीस आयुक्त 


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -