घरदेश-विदेशगृहमंत्री राजनाथ सिंह उद्या श्रीनगरला जाणार

गृहमंत्री राजनाथ सिंह उद्या श्रीनगरला जाणार

Subscribe

गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या जवानांना श्रध्दांजली वाहून जखमी जवानांनी लवकर बरे व्हावे यासाठी प्रार्थना केली आहे.

जम्मू-काश्मिरच्या इतिहासातील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आज झाला. जम्मू-काश्मीरच्या अवंतीपोरा येथे सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा देशभरातून निषेध केला जात आहे. या हल्ल्याचा केंद्र सरकारने देखील निषेध केला आहे. केंद्रिय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी हा भ्याड हल्ला असल्याचे म्हटले आहे. त्यांनी या हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या जवानांना श्रध्दांजली वाहिली असून जखमी जवानांनी लवकर बरे व्हावे यासाठी प्रार्थना केली आहे. त्यांनी जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्याशी चर्चा करुन पुलवामा येथील परिस्थितीचा आढावा घेतला आहे. दरम्यान, राजनाथ सिंह उद्या श्रीनगरला जाणार आहे.

- Advertisement -

पुलवामाच्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्रीय यंत्रणा हादरली आहे. गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक, सीआरपीएफचे डीजी आर आर भटनागर यांच्याशी फोनवरुन बातचित केली. दरम्यान, राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी पटनामध्ये होणारी सभा रद्द केली असून उद्या ते जम्मू-काश्मीरचा दौरा करणआर आहेत. तर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी सीआरपीएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून संपूर्ण घटनाक्रमाची माहिती घेतली आहे.

- Advertisement -

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यामध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने सीआरपीएफच्या जवानांवर हल्ला केला. या हल्ल्यानंतर जवानांवर गोळीबार करण्यात आला. पुलवामाच्या अवंतीपोरा येथे ही घटना घडली आहे. आयईडीच्या स्फोटामध्ये सीआरपीएफचे ३० जवान शहीद झाले आहेत तर ४५ जवान जखमी झाले आहेत. या हल्ल्यानंतर परिसरामध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. अडीच हजार जवानांचा ताफा जात असताना दहशतवाद्यांनी हा हल्ला केला आहे.

Priya Morehttps://www.mymahanagar.com/author/priya/
गेल्या ६ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत आहे. मला लिहायला, वाचायला आवडतेच पण त्यासोबतच मला नविन ठिकाणी फिरायला खूप आवडते. सध्या नविन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -