घरCORONA UPDATEcorona test : आता घरच्या घरी करु शकता तुम्ही कोरोना चाचणी, ICMR...

corona test : आता घरच्या घरी करु शकता तुम्ही कोरोना चाचणी, ICMR च्या नवीन गाइडलाईन्स

Subscribe

नागरिकांना कोरोना चाचणी करण्यासाठी आता खासगी किंवा सरकारी रुग्णालय जाण्याची गरज नाही. कारण केंद्र सरकारच्या इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चने बुधवारी नागरिकांना घरीच्या घरी कोरोना चाचणी करण्यासाठी काही गाईडलाईन्स जाहीर केल्या आहेत. ज्याआधारे तुम्ही घरच्या घरी आपली कोरोना चाचणी करु शकणार आहात. यासाठी ICMR ने CoviSelf या किटला मंजुरी दिली आहे. या किटच्या माध्यमातून कोरोना रॅपिड अँटीजन टेस्टिंग करण्यासाठी नाकातील स्वबची आवश्यकता असणार आहे. मायलॅब डिस्कवरी सोल्युशन लिमिटेड कंपनीने रॅपिड अँटीजन टेस्टिंग CoviSelf या किटची निर्मिती केली आहे.

१८ वर्षावरील व्यक्तींच्या किंवा २ वर्षांखाली आणि त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींचे घरच्या घरी नाकातील स्वब घेत कोरोना टेस्ट करण्यासाठी CoviSelf या किटचा वापर केले जाणार आहे. परंतु या किटचा कोणत्याही प्रकारे गैरवापर झाले नाही पाहिजे असे ICMRने स्पष्ट केले आहे. केवळ ज्या लोकांना कोरोनाची तीव्र लक्षणे आहेत आणि ज्या व्यक्ती कोरोनाबाधितांच्या संपर्कात होत्या अशा व्यक्तींनीच घरी कोरोना टेस्ट करण्यासाठी या किटचा वापर करायचा आहे असे ICMRने जाहीर केले आहे.

- Advertisement -

या किटचा वापर कसा कराल?

१) घराच्या घरी कोरोना टेस्ट करण्यासाठी ICMRने एक व्हिडिओ लिंक दिली आहे त्या लिंकमधील व्हिडिओतील स्टेप्स पाहून तुम्ही घराच्या घरी कोरोना टेस्ट करु शकता.

- Advertisement -

२) तसे तुम्ही ‘होम टेस्टिंग’ हे मोबाईल अॅप Google play store किंवा Apple store डाउनलोड करत त्यामाध्यमातून घरच्या घरी टेस्ट करु शकता.

३) या होम टेस्टिंग अॅपच्या माध्यमातून टेस्टिंग कसे करावे आणि कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह हे असे ओळखावे याचे मार्गदर्शन केले जाईल.

४) यानंतर होम टेस्टिंग अॅप डाऊनलोड केलेल्या मोबाईलमधूनच तुम्ही घरी केल्या कोरोना टेस्ट किटचा एक फोटा त्या अॅपमध्ये अपलोड करायचा आहे.

५) तुम्ही कोरोना टेस्ट केल्यानंतर जो डेटा अॅपमध्ये  सेव केले आहे तो डेटा सुरक्षितरित्या ICMR COVID-19 testing portal वर अपलोड केला जाणार आहे. हा सर्व डेटानंतर एकत्रित केला जाईल.

६) यात पॉझिटिव्ह टेस्ट आलेल्या रुग्णांच्या गोपनियतेची पूर्ण काळजी घेतली जाईल.

७) दरम्यान या किटच्या माध्यमातून पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णाला कोरोनाबाधित ठरले जाईल त्यामुळे त्यांना पुन्हा टेस्ट करण्याची आवश्यकता नाही.

८) यानंतर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला ICMR आणि केंद्रीय आरोग्य परिवार कल्याण मंत्रालयाच्या प्रोटोकॉलनुसार होम आयसोलेशनमध्ये राहून काळजी घ्यावी लागेल. https://www.icmr.gov.in/chomecare.html या वेबसाईटवर प्रोटोकॉल देण्यात आले आहेत.

९) ज्या व्यक्तींची RAT टेस्ट निगेटिव्ह आली आहे अशा व्यक्तींनी तात्काळ RT-PCR द्वारे पुन्हा टेस्ट करावी. कारण अनेकदा RAT टेस्ट पॉझिटिव्ह असून निगेटिव्ह येते कारण कोरोना विषाणूचा नवा व्हेरियंट या टेस्टला चकवा देत आहे.

१०) तसेच RAT टेस्ट निगेटिव्ह आलेल्या सर्वांना कोरोनाबाधित असल्याचे गृहीत धरून त्यांचा RTPCR टेस्ट अहवाल येत नाही तोपर्यंत त्यांना ICMR / MoH&FW च्या होम आयसोलेशन प्रोटोकॉलचे पालन करण्याचा सल्ला दिला जात आहे.

११) या किटचा वापर करण्यासाठी कंपनीने तयार केलेल्या प्रोटोकॉलनुसार तुम्हाला योग्यप्रकारे कोरोना टेस्ट करता येणार आहे. (यासाठी व्हिडिओ लिंक आणि केंद्राने मंजूर केलेल्या किटची माहिती दिली आहे)

१२) दरम्यान या स्वब किट, स्वॅब आणि इतर सामग्रीच्या योग्य विल्हेवाट लावण्यासाठी किट निर्मात्याने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे.


‘लिव्ह इन रिलेशनशीप’मधील जोडप्यास संरक्षण देण्यास न्यायालयाचा नकार, नेमके काय आहे प्रकरण ?


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -