घरदेश-विदेशउद्योगपतींची कर्जे माफ होतात तर शेतकर्‍यांची का नाही

उद्योगपतींची कर्जे माफ होतात तर शेतकर्‍यांची का नाही

Subscribe

राहुल गांधींचा मोदींना सवाल

शेतीतील विविध समस्यांचे गार्‍हाणे मांडण्यासाठी राजधानीत पोहोचलेल्या शेतकर्‍यांना संबोधित करताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती टीका केली. जर पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या 15 निकटवर्तीय मित्रांची कर्जे माफ करू शकतात, तर मग देशातील कोट्यवधी शेतकर्‍यांची कर्जेही त्यांनी माफ केली पाहिजेत, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली. यावेळी आंदोलनकर्त्या शेतकर्‍यांना पाठिंबा देण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह विरोधी पक्षांच्या अनेक नेत्यांनी उपस्थित होते.

राहुल गांधी यांनी शुक्रवारी दुपारी आंदोलनकर्त्या शेतकर्‍यांची भेट घेतली. त्यानंतर येथे आलेल्या हजारो शेतकर्‍यांना संबोधित करताना ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंबानी आणि अदानी यांच्यात देश वाटून टाकला आहे. जर 15 धनाढ्य लोकांचे कर्ज माफ होत असेल, तर देशातील कोट्यवधी शेतकर्‍यांचेही कर्ज माफ झाले पाहिजे. शेतकरी तुमच्याकडे कुठलीही फुकटची भेट मागत नाहीत. ते आपला हक्क मागत आहेत. मोदींनी हमीभाव, विमा आदींबाबत आश्वासने दिली होती. मात्र आता ते केवळ पोकळ भाषणे देत आहेत.

- Advertisement -

मोदी, शाह दुर्योधन आणि दु:शासन
शेतकर्‍यांना संबोधित करताना सीपीआय (एम) चे नेते सीताराम येचुरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. मोदी आणि शाह म्हणजे आजच्या काळातील दुर्योधन आणि दु:शासन आहेत, असे येचुरी यांनी म्हटले. तसेच भाजपा आणि संघाकडे निवडणूक जिंकण्यासाठी केवळ राम मंदिराचा मुद्दाच शिल्लक राहिला आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

येचुरी म्हणाले, नरेंद्र मोदी आणि आरएसएसकडे आता केवळ राम मंदिर हा एकच मुद्दा उरला आहे. त्यामुळे निवडणूक जवळ आल्यावर त्यांनी राम नामाचा जप सुरू केला आहे. दरम्यान, राजधानीमध्ये आलेल्या शेतकर्‍यांना पाठिंबा देण्यासाठी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी गर्दी केली आहे. यावेळी स्वराज इंडियाचे प्रमुख योगेंद्र यादव यांनी, नरेंद्र मोदी, किसान विरोधी हा नारा शेतकर्‍यांनी लक्षात ठेवावा, असे आवाहन केले.

- Advertisement -

शेतकरी पंतप्रधान ठरवतील
शेतकर्‍यांच्या दोन प्रमुख मागण्या आहेत. त्या मागण्या मान्य करण्यासाठी सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलवावे. अन्यथा आगामी लोकसभा निवडणुकीत लाल किल्यावरुन भाषण करणारे पंतप्रधान कोण असतील, ते देशातील शेतकरीच ठरवतील, असे राजू शेट्टी यांनी सांगितले.

देशातील शेतकर्‍यांच्या मागण्या मान्य करणारा व्यक्तीच देशावर राज्य करणार आहे. त्यामुळे शेतकरी ज्यांना पाठिंबा देतील, त्याचीच सत्ता येईल आणि जे कोणी शेतकर्‍यांकडे दुर्लक्ष करील, त्याचे नुकसानच होईल, असेही राजू शेट्टी यावेळी म्हणाले. जीएसटीसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलविण्यात आले. हे अधिवेशन मध्यरात्री पार पडले. यासाठी दोन्ही सभागृह एकत्र येतात आणि जीएसटीला मंजुरी मिळते. मग शेतकर्‍यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन का नाही, असा सवालही राजू शेट्टींचा सरकारला केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -