घरअर्थजगतUnion Budget 2023: IFSC Act मध्ये बदल होणार, परदेशी बँकांसाठी केंद्राकडून पायघड्या

Union Budget 2023: IFSC Act मध्ये बदल होणार, परदेशी बँकांसाठी केंद्राकडून पायघड्या

Subscribe

Union Budget 2023 | बँकिंग कंपनी अॅक्ट, आरबीआय अॅक्ट आणि आयएफएससी अॅक्टमध्ये बदल होणार आहे.

Union Budget 2023 | नवी दिल्ली – अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी अर्थसंकल्प २०२३ -२४ (Union Budget 2023) नुकताच सादर केला. यामध्ये बँकिंग क्षेत्रासाठीही मोठ्या घोषणा आणि बदल प्रस्तावित असल्याचे सांगितले. यानुसार, इंडियन फायनान्सशिअल सिस्टम कोडमध्ये खुल्या बँकांना परदेशी बँका अधिग्रहण करू शकतात. यासाठी Banking Companies Act, RBI Act आणि IFSC Act मध्ये बदल होणार आहे.

हेही वाचा – Union Budget 2023: पॅनकार्ड आता ओळखपत्र म्हणून पुरावा, केंद्रीय अर्थसंकल्पात मोठी घोषणा

- Advertisement -

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी केंद्रीय अर्थसंकल्प मांडत असताना मोठ्या घोषणा केल्यात. 2.5 लाख रुपयांपासून सुरू होणाऱ्या 6 टप्प्यातील उत्पन्न कर रचनेत बदल करण्यात आला आहे. या व्यवस्थेतील कर रचनेत बदल करत करमुक्त सवलतीची मर्यादा 3 लाख रुपयांपर्यंत वाढवण्याची घोषणा करण्यात आली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी टॅक्स स्लॅबबाबत मोठी घोषणा केली आहे. आता नव्या करप्रणालीनुसार 7 लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या व्यक्तीला कोणताही कर भरावा लागणार नाही. आतापर्यंत ही मर्यादा ५ लाख रुपयांपर्यंत होती. अर्थमंत्र्यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात वैयक्तिक करदात्यांच्या प्राप्तिकर रचनेत वाढ करण्याची घोषणा केली आहे. प्राप्तिकरात आता 5 लाख रुपयांवरून 7 लाख रुपयांपर्यंत सूट देण्यात आली आहे. नवीन कर प्रणालीतील लोकांना सात लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही प्राप्तिकर भरावा लागणार नाही.


नवीन कर रचना अशी असणार

- Advertisement -

0 ते 3 लाख रुपये – 0
3 ते 6 लाख रुपये – 5%
6 ते 9 लाख रुपये – 10%
9 ते 12 लाख रुपये – 15%
12 ते 15 लाख रुपये – 20%
15 लाखांहून अधिक रुपये – 30%

आयकार्ड बनले ओळखपत्र

केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोठी घोषणा केली. पॅनकार्ड हे आता प्रत्येक व्यक्तिसाठी ओळखपत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. आधारकार्ड जसे ओळखपत्र म्हणून वापरण्यात येते तसेच पॅनकार्ड ओळखपत्र असेल. यामुळे आयकर विभाग, टॅक्सपेयर आणि गुंतवणूकीसाठीची पद्धत फार सोपी होणार आहे. पॅनकार्ड सिंगल विंडो ओळखपत्र असेल आणि केवायसी अपडेट करण्याठी सक्षम असेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -