घरदेश-विदेशVishwa Sadbhawana event : ऑस्ट्रेलियात पाकिस्तानी म्हणाले, 'मोदी है तो मुमकिन है'

Vishwa Sadbhawana event : ऑस्ट्रेलियात पाकिस्तानी म्हणाले, ‘मोदी है तो मुमकिन है’

Subscribe

मेलबर्न : ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे झालेल्या विश्व सद्भावना संमेलनात (Vishwa Sadbhawana event) पाकिस्तानी नागरिकांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे कौतुक केले. ‘मोदी है तो मुमकीन है’ असे त्यांनी सांगितले. याशिवाय, पंतप्रधान मोदी अन्य समाजांचा आदर करत असल्याचे मत इतर धर्मियांनी यावेळी व्यक्त केले.

एनआयडी फाउंडेशन (दिल्ली), इंडियन मायनॉरिटीज फाऊंडेशन (IMF) आणि नामधारी शीख सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने मेलबर्नच्या बुंजिल पॅलेस (Bunjil Palace) येथे आयोजित केलेल्या या संमेलनात अनेक धार्मिक नेते, विचारवंत, विद्वान, प्रचारक आणि संशोधक सहभागी झाले होते. पाकिस्तानातील अहमदिया मुस्लीम तसेच अन्य धर्मातील मान्यवर यात सहभागी झाले. विशेष म्हणजे या सर्व लोकांनी पंतप्रधान मोदी यांचे कौतुक केले.

- Advertisement -

पंतप्रधान मोदी सर्व समुदायांचा आदर करतात, जे आम्हाला खूप आवडते. सर्वांना सोबत घेऊन जाण्याची क्षमता त्यांच्यात आहे. म्हणूनच आम्ही त्याची स्तुती करतो, असे अहमदिया मुस्लिमांनी सांगितले. दुसरीकडे, लाहोरशी संबंधित अहमदिया मुस्लीम समाजाचे डॉ. तारिक बट्ट म्हणाले, “माझे अनेक मित्र भारतीय आहेत आणि मी त्यांना एकत्रितपणे अनेक उपक्रम करताना पाहिले आहे. मी त्यांच्या या उपक्रमांमध्ये देखील सहभागी झालो आहे. मला वाटते की, आता भारतीय मुस्लीम आणि पाकिस्तानी मुस्लिमांमध्ये आता संपर्क वाढत आहे. आम्हाला फरकांपेक्षा समानता अधिक आणायची आहे. मोदी है तो मुमकिन है, असे ते म्हणाले. विविध समाजांमधील सौहार्द आणि शांतता वाढविण्याच्या दृष्टीने पंतप्रधान मोदी हे या समाजांना एकमेकांना जोडले जोडले जाण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत, असेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -

हा कार्यक्रम म्हणजे हिंदू आणि मुस्लीम समाजांना एकत्र आणण्याचे व्यासपीठ असल्याचे उपस्थितांनी म्हटले आहे. ते पंतप्रधान मोदींचा करिष्मा आहे जिथे लोक त्यांच्या धार्मिकतेची पर्वा न करता त्यांचे अनुकरण करतात, हे चांगले आहे, अशी पुस्तीही अनेकांनी जोडली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -