घरदेश-विदेशखुशखबर; ५ लाखांपर्यंत उत्पन्न होणार करमुक्त

खुशखबर; ५ लाखांपर्यंत उत्पन्न होणार करमुक्त

Subscribe

मध्यम वर्गीय नोकरदार वर्गाला खुश करण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली लवकरच आयकराच्या मर्यादेत दुपटीने वाढ करणार आहेत. मध्यम वर्गीय नोकरदार वर्गाचं पाच लाखांपर्यंतचं वार्षिक उत्पन्न करमुक्त करण्यात येणार आहे.

आगामी निवडणूक आल्यावर जनतेला खूश ठेण्याचा सरकारचा प्रयत्न असतो. असा एक प्रयत्न पुन्हा एकदा केला जात असल्याचे समोर आले आहे. जनतेला खूश करण्यासाठी केंद्राकडून नव्या घोषणा केल्या जातात. अशीच एक घोषणा केली जाणार असून ती मध्यम वर्गीय नोकरदार वर्गासाठी आनंदाची असणार आहे. मध्यम वर्गीय नोकरदार वर्गाला खुश करण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली लवकरच आयकराच्या मर्यादेत दुपटीने वाढ करणार असल्याची घोषणा करणार असल्याची माहिती समोर आली आहे. मध्यम वर्गीय नोकरदार वर्गाचं पाच लाखांपर्यंतचं वार्षिक उत्पन्न करमुक्त करण्याच्या हालचाली केंद्राने सुरु केल्या आहेत.

मध्यम वर्गातील नोकरदार वर्गाला दिलासा

सध्याच्या कर रचनेत अडीच लाखांपर्यंत उत्पन्न हे करमुक्त आहे. त्यात वाढ होणार असून आयकरासाठीची मर्यादा ५ लाख रुपये करण्याचा निर्णय केंद्र सरकार घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्याचबरोबर वैद्यकीय आणि परिवहन भत्ता देखील पुन्हा सुरु केला जाण्याची शक्यता आहे. मात्र केंद्राच्या या निर्णयामुळे मध्यम वर्गातील नोकरदार वर्गाला मोठा दिलासा मिळणार आहे.

- Advertisement -

अशी आहे आयकरची तरतूद

सध्या २.५ लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त आहे. तर २.५० लाख ते पाच लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना पाच टक्के आयकर भरावा लागतो. त्यासोबतच ५ ते १० लाख उत्पन्न असणाऱ्यांसाठी २० टक्के आणि १० लाखांहून अधिक उत्पन्न असणाऱ्यांना ३० टक्के आयकरची तरतूद आहे. मात्र यातील पहिल्या रचनेत बदल करुन ५ लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना करमुक्त करण्याचा विचार केंद्र सरकारने केला आहे. याशिवाय, गेल्या वर्षी देखील ५ लाख उत्पन्न असणाऱ्यांना वैद्यकीय खर्चासाठी १५ हजार तर परिवहन खर्चासाठी १९ हजार २०० रुपयांचा भत्ता रद्द करुन थेट २० हजारांच्या कपतीचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता हा निर्णय रद्द करुन पुन्हा एकदा वैद्यीय आणि परिवहन भत्ता सुरु करण्याचा केंद्राचा विचार असल्याची माहिती समोर आली आहे.


वाचा – सीबीआयची परिस्थिती विचित्र आणि दुर्दैवी – अरुण जेटली

- Advertisement -

वाचा – २८ टक्के जीएसटी लवकरच रद्द होणार – जेटली


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -