घरदेश-विदेशगौरवास्पद : भारत बनला जगातील पाचवा सर्वात मोठा निर्यातदार देश

गौरवास्पद : भारत बनला जगातील पाचवा सर्वात मोठा निर्यातदार देश

Subscribe

भारत हा या आर्थिक वर्षात 750 बिलियन डाॅलर्सची निर्यात करुन जगातील पाचवा सर्वात मोठा निर्यातदार देश बनला आहे.

2023-23 या आर्थिक वर्षात 750 बिलियन डाॅलर्सची निर्यात करुन भारत जगातील पाचवा सर्वोत मोठा निर्यातदार देश बनला आहे. मागच्या वर्षी भारताचा निर्यातीत नववा क्रमांक होता. भारत हा या आर्थिक वर्षात 750 बिलियन डाॅलर्सची निर्यात करुन जगातील पाचवा सर्वात मोठा निर्यातदार देश बनला आहे.

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी ट्वीट शेअर करत, ही माहिती दिली आहे. पियूष गोयल यां नी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात 750 अब्ज डा‌लर्सपेक्षा जास्त निर्यात साध्य केल्याची माहिती दिली. या कामगिरीबद्दल भारतातील नागरिकांचे अभिनंदन. हीच भावना भारताला आगामी काळात स्वावलंबी बनवेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करताना म्हटले आहे.

- Advertisement -

भारत मागच्या वर्षी 2 सप्टेंबर 2022 रोजी ब्रिटनला मागे टाकून जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली. अमेरिका, चीन, जपान आणि जर्मनी या चार देशांनंतर भारताची अर्थव्यवस्था पाचव्या स्थानी आहे. आता आणखी एक विक्रम भारताने आपल्या नावावर केला आहे.

मागच्या वर्षी 2021-22 मध्ये भारताने 600 अब्ज डाॅलर्सची निर्यात केली होती आणि त्यामुळे तो नवव्या क्रमांकावर होता. कोरोनानंतर जागतिक संकट, रशिया- युक्रेन युद्ध, जागतिक मंदी, चढे व्याजदर, ऊर्जा संकट, उत्पादन बंद या सर्व गोष्टींचा विचार करता भारताने केलेली कामगिरी ही उल्लेखनीय आहे.

- Advertisement -

( हेही वाचा:  सोन्यातील गुंतवणुकीमुळे किंमत वाढण्याची शक्यता? जाणून घ्या आजचा भाव )

भारत तांदळाचा सर्वात मोठा निर्यातदार

भारत हा तांदळाचा जगातील सर्वात मोठी निर्यातदार देश आहे. भारताच्या तांदळाला जगातील अनेक देशांमधून मोठ्या प्रमाणात मागणी आहे. यावर्षी तांदळाच्या निर्यातीत मोठी वाढ झाली आहे. भारतीय तांदळाला जगात मोठी मागणी आहे. भारताततून दरवर्षी अनेक देश मोठ्या प्रमाणात तांदळाची आयात करतात. अमेरिका, इराण, येमेनसह इतर देशांमध्ये भारताच्या तांदळाला मोठी मागणी असते.

यावर्षी देशातून तांदळाची मोठ्या प्रमाणात निर्यात होत आहे. देशातून बासमती आणि गैर बासमीत तांदळाची मोठ्या प्रमाणात निर्यात झाली आहे.

( हेही वाचा: पती भीक मागत असला तरी पत्नीला पोटगी द्यावीच लागेल; पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाचा निर्वाळा )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -