Thursday, May 6, 2021
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE चिंताजनक! देशात गेल्या २४ तासांत सर्वाधिक मृत्यूची नोंद, पॉझिटिव्ह रुग्णही वाढले

चिंताजनक! देशात गेल्या २४ तासांत सर्वाधिक मृत्यूची नोंद, पॉझिटिव्ह रुग्णही वाढले

Related Story

- Advertisement -

देशात कोरोनास्थिती दिवसागणिक गंभीर बनत असून रुग्णसंख्या नवनवे रेकॉर्ड ब्रेक करत आहे. यात मंगळवारी देशातील रुग्णसंख्येत काही अंशी घट झाली होती, मात्र आज रुग्णसंख्येची चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे. देशात गेल्या २४ तासांत आत्तापर्यंतच्या सर्वाधिक कोरोना मृतांची नोंद झाली आहे. तसेच भारतात आत्तापर्यंत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत.

आज देशात ३ लाख ६० हजार ९६० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर कोरोना मृतांचा आकडा ३२९३ वर पोहचला आहे. त्यामुळे देशात कोरोनाचा कहर कायम असून आज कोरोनामुळे मृत पावणाऱ्या रुग्णसंख्येने नवा उच्चांक गाठला आहे. यात २ लाख ६१ हजार १६२ नागरिकांनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांचा संख्येत थोडी वाढ झाली आहे. याबाबतची आकडेवारी नुकतीच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केली आहे.

- Advertisement -

आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या २४ तासांत ३ लाख ६० हजार ९६० नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आल्याने देशातील आत्तापर्यंतची करोना रुग्णसंख्या १ कोटी ७९ लाख ९७ हजार २६७ वर पोहचली आहे. . तर २४ तासांत ३२९३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आज देशात सर्वाधिक मृत्यूंची नोंद झाली आहे. करोनामुळे आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या २ लाख १ हजार १८७ वर पोहोचली आहे. दरम्यान देशात गेल्या २४ तासात २ लाख ६१ हजार १६२ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्यामुळे उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यंत देशात १ कोटी ४८ लाख १७ हजार ३७१ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. देशात सध्या २९ लाख ७८ हजार ७०९ अॅक्टिव्ह रुग्ण असून १४ कोटी ७८ लाख २७ हजार ३६७ जणांचं लसीकरण झालं आहे.


Registration for Vaccine १८ वर्षावरील सर्वांना ‘या’ वेळेत मिळणार लस, दोन मिनिटात करा रजिस्ट्रेशन
- Advertisement -