घरदेश-विदेश"भारत युएनचे निर्बंध मानणार, अमेरिकेचे नाही'' - सुषमा स्वराज

“भारत युएनचे निर्बंध मानणार, अमेरिकेचे नाही” – सुषमा स्वराज

Subscribe

परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी सोमवारी इराणचे परराष्ट्रमंत्री जावेद झरीफ यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान दोन्ही मंत्र्यांमध्ये अनेक महत्वाच्या मुद्यांवर चर्चा झाली. यावेळी जरीफ यांनी अमेरिकेचा दबाव जुगारत इराणमधील अणू करार अबाधित राहावा यासाठी भारताकडे समर्थन मागितले. अमेरिकेने याआधीच अणू करारामधून काढता पाय घेतला आहे. अमेरिकने घेतलेल्या निर्णयाचा अणू करारावर विपरीत परिणाम होऊ शकतो असं बोललं जात आहे.

या मुद्द्यावर आपलं पडखर मत व्यक्त करताना स्वराज म्हणाल्या, ”ईराण आणि व्हेनेझुएला या देशांवर अमेरिकेने निर्बंध लादले आहेत. मात्र, असे असले तरीही भारत या दोन्ही देशांसोबत आपले व्यवहार कायम ठेवेल. कारण आम्ही फक्त युएनचे प्रतिबंध मानतो, अमेरिकेचे नाही. भारत कोणत्याही देशाच्या दबावाखाली येऊन आपली परराष्ट्रीय धोरणं ठरवणार नाही.”

- Advertisement -

दरम्यान सुषमा स्वराज यांनी केलेल्या या स्पष्ट वक्तव्याची, राजकीय वर्तृळात चर्चा पाहायला मिळते आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -