घरताज्या घडामोडीकठुआच्या धरण क्षेत्रात भारतीय सैन्याचे हेलिकॉप्टर क्रॅश

कठुआच्या धरण क्षेत्रात भारतीय सैन्याचे हेलिकॉप्टर क्रॅश

Subscribe

हेलिकॉप्टरचे दोन्ही पायलट सुरक्षित

जम्मू काश्मिरच्या कठुआ जिल्ह्यातील रणजित सागर धरण क्षेत्रात भारतीय सैन्याचे हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची घटना आज मंगळवारी घडली. या घटनास्थळी सध्या एनडीआरएफची टीम पोहचली असून शोध आणि बचावकार्याला सुरू झाले आहे. या घटनेत कोणतिही जिवितहानी झाली नसल्याची माहिती पंजाबच्या पठाणकोटचे पोलिस अधिक्षक सुरेंद्र लांबा यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिली आहे. पंजाबच्या ३० किलोमीटर परिसरात हे धरण क्षेत्र आहे. सैन्याच्या २५४ आर्मी एव्हिएशन स्क्वॉड्रॉन या हेलिकॉप्टरचे १०.२० वाजता टेक ऑफ झाले. धरण क्षेत्र परिसरात आल्यानंतर या हेलिकॉप्टरचा अपघात झाल्याची माहिती आहे.

- Advertisement -

घटनास्थळी रेस्क्यू टीम सध्या पोहचल्या असून बचावकार्यासाठी डायव्हर्सची बोलावण्यात आले आहेत. पण या हेलिकॉप्टरमध्ये किती लोक होते याबाबतची माहिती अद्यापही मिळू शकलेली नाही, असे कठुआ जिल्ह्याचे एसएसपी आर सी कोतवाल यांनी सांगितले. याआधीची कथुआ जिल्ह्यातील लखनपूर जिल्ह्यात जम्मू काश्मिरच्या सीमेनजीक एका हेलिकॉप्टरचा अपघात झाला होता. तांत्रिक दोष निर्माण झाल्याने HAL ध्रुव हेलिकॉप्टर क्रॅश झाले होते. तर जानेवारीत राजस्थानमध्ये एमआयजी २१ बिसॉन एअरक्राफ्ट लॅण्डिंगच्या दरम्यान क्रॅश झाले होते.

या हेलिकॉप्टर क्रॅश अपघातात दोन्ही पायलट सुखरूप असल्याची माहिती एनएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे. वेपन सिस्टिम इंटिग्रेटेड हेलिकॉप्टरने पठाणकोट येथून टेक ऑफ केल्यानंतर काही अतंरावरच या हेलिकॉप्टरचा अपघात झाल्याची माहिती आहे.

- Advertisement -


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -